कोल्हापूर - पोलीस ठाण्यातच चोरट्यांनी डल्ला मारल्याचा प्रकार कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे घडला आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील कारकून कक्ष फोडून तब्बल 185 मोबाईलसह 7 लाखांची रोकड असा एकूण 14 लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
हेही वाचा - अजय देवगणच्या चाहत्यांचा उत्साह; शंभराव्या चित्रपटाच्या निमित्ताने जल्लोष
पोलीस ठाण्यातच झालेल्या चोरीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर या चोरीमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस ठाण्यातील कारकून खोलीचा दरवाजा, लोखंडी ग्रील उचकटून आणि कपाट फोडून चोरट्यांनी ही हातसफाई केली आहे. याप्रकरणी पोलीस काही संशयितांचा तपास करत आहेत. शहरातील सीसीटीव्ही फुटेज मिळतात का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.