कोल्हापूर - त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त नृसिंहवाडी येथील दत्त मंदिर परिसरात दिपोत्सव साजरा झाला. भाविकांनी लावलेल्या हजारो दिव्यांनी हा कृष्णाकाठ उजळून निघाला. कोरोनामुळे दीपोत्सव रद्द होईल अशी शक्यता होती. मात्र, हजारो भाविकांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा झाला. यावेळी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी दत्तगुरुंचे दर्शन घेत केलेल्या जल्लोषाने कृष्णाकाठ दणाणून गेला.
दीपोत्सव 2021 : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त हजारो दिव्यांचा झगमगाट - Tripurari Purnima
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील कृष्णाकाठ परिसर प्रसन्न वातावरणात दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दीने फुलून गेला होता. दत्त मंदिर परिसरात भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
कोल्हापूर