कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील वेतवडे गावात परिचीत असलेल्या वृद्ध पाटील दाम्पत्याने आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या दाम्पत्याने अत्यविधीसाठी लागणारे सर्व साहित्य गोळा करुन एका शेतात ठेवले होते. पाटील दाम्पत्य गावात परिचीत असल्याने गावभर शोककळा पसरली आहे. मंगळवारी रात्री 2 वाजेच्या दरम्यान राहत्या घरी दाम्पत्याने आत्महत्या केली. पाटील दाम्पत्याचा मुलगा आकाराम महादेव पाटील या घटनेची माहिती होताच त्यांनी कळे पोलिसांना सूचना केली. कळे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी घटनेचा तपास करत आहे.
का केली आत्महत्या : महादेव दादु पाटील (वय-75 ) व त्यांची पत्नी द्वारकाबाई महादेव पाटील( वय-70 ) असे आत्महत्या केलेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. दोन मुले, सुना, नातवंडे असा दाम्पत्याचा परिवार आहे. हे मृत दाम्पत्य पन्हाळा तालुक्यातील वेतवडे या गावात राहत होते. यांच्या घराची परिस्थिती बेताचीच होती. वयाचे 70 वर्ष झाल्यानंतर ते दिवसभर शेतात राबत असायचे. या वृद्ध दाम्पत्याचे काम पाहून गावकरी त्यांना स्वाभिमानी वृद्ध दाम्पत्य म्हणत. सर्व गावकरी आदराने आण्णा, द्वारका आई या नावाने हाक मारत. परंतु वय झाल्यामुळे त्या दोघांना आजाराने ग्रासले होते. या आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्यण घेतला.
अत्यविधीचे तयारी : आत्महत्या करण्यापूर्वी या दाम्पत्याने मृत्यूनंतर अत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवा-जुळव केली. दाम्पत्याचे या निर्णायामुळे घरातील परिवारासह गावकऱ्यांवर शोककळा पसरली आहे.पाटील दाम्पत्य वयाचे 75 वी पार केल्यानंतरही शेतात जिद्दीने राबत होते. ते दाम्पत्य आजारापणाला कंटाळून आत्महत्या कशी काय करेल. असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान कळे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
हेही वाचा -