ETV Bharat / state

९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचा लोगो बनला कोल्हापुरात! - ९४ व्या मराठी साहित्य संमेलन नाशिक

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गोदावरीच्या तिरी म्हणजे नाशिकमध्ये होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या लोगोची निर्मिती कोल्हापूरमध्ये झाली आहे. 'स्वच्छ भारत'चा लोगो ज्या अनंत खासबागदार यांनी केला त्याच खासबागदारांनी साहित्य संमेलनाच्या लोगोची निर्मिती देखील केली आहे.

logo of the 94th Marathi Sahitya Sammelan

author img

By

Published : Jan 31, 2021, 3:54 PM IST

Updated : Jan 31, 2021, 4:27 PM IST

कोल्हापूर - 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा गोदावरीच्या तिरी म्हणजे नाशिकमध्ये होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या लोगोची निर्मिती कोल्हापूरमध्ये झाली आहे. 'स्वच्छ भारत'चा लोगो ज्या अनंत खासबागदार यांनी केला त्याच खासबागदारांनी साहित्य संमेलनाच्या लोगोची निर्मिती देखील केली आहे.

९४ व्या मराठी साहित्य संमेलनाचा लोगो बनला कोल्हापुरात

लोगोचे वैशिष्ट्य -

प्रतिभेच्या अवकाशातून निर्माण होणारे साहित्य हे अनंताकडून अनंताकडे प्रवाहित होणार आहे. त्याच्या निदर्शक डावीकडील प्रारंभाच्या रेषा आहेत या रेषा वेगवेगळ्या स्तरांवरून येत ग्रंथाकडे प्रवासात जातात. मध्यभागी लेखनाचा महत्वाचा टप्पा आहे. ग्रंथ तृप्तता जो उलगडलेला दिसतोय आणि त्याचा अवकाशातून झरणारी लेखणी साहित्यातील समतोलाचे प्रतीक आहे. उजवीकडील पुस्तकाच्या पानातून पुढे प्रवासात जात आहेत. ते गोदावरीचे चैतन्यदायी प्रवाह आहे. अनंताकडून ग्रंथाकडे मी ग्रंथाकडून नदी प्रवाहाच्या माध्यमाद्वारे लोकसंस्कृती सामाजिक जाणिवा समृद्ध करत पुन्हा अनंताकडे जाणाऱ्या लाटा दर्शवतात.

ग्रंथाच्या मध्यावर मराठी साहित्याच्या समतोलाचे प्रतीक असणाऱ्या लेखणीचा केशरी रंग, 'परी अमृताते ही पैजा जिंके' सांगणार्‍या ज्ञानोबांच्या आणि आम्ही 'घरी धन शब्दांचीच रत्ने' म्हणणाऱ्या तुकोबांच्या संत परंपरेतून महाराष्ट्रात घडलेल्या सामाजिक जागराचा शब्दांच्या माध्यमातून घडवलेल्या जगावेगळ्या सामाजिक क्रांतीचं आणि नव्या सुर्योदयाच्या समस्येचे क्षितिजाचे प्रतीक दर्शवतो. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर दिसणारा सूर्योदय नवनवीन कल्पना सहज सतत उगम पावणार्‍या साहित्य स्त्रोताचे प्रतीक आहे. नव्या विचारांच्या नव्या आबा घेऊन उगवणारा मराठी साहित्य संस्कृतीचा हा सूर्य मराठी जनांच्या आशा आकांक्षांचा नव्या प्रारंभी प्रतीक आहे. अग्रभागी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या कवितेतील ओळी घोषवाक्य म्हणून निवडताना मराठी साहित्य ही केवळ रंजन प्रधान गोष्ट नसून ती समाजाला जगण्यासाठी महत्त्वाचे ध्येय देणारी अपार क्षमता असलेल्या आमची संस्कृती आहे. हा विचार होता म्हणूनच 'अनंत आमुची ध्येयासक्ती' या अधिक समर्पक व्यापक अर्थ असलेल्या ओळी घोषवाक्य म्हणून निवडल्या आहेत.

स्वच्छ भारतचा लोगो व मोदींची घोषणा -

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या 'स्वच्छ भारत अभियाना'साठी बोधचिन्ह स्पर्धा घेण्यात आली होती. त्यामध्ये निर्मिती ग्राफिक्स या जाहिरात संस्थेचे संचालक अनंत खासबारदार यांनी तयार केलेल्या बोधचिन्हाला देशभरातून पहिला क्रमांक मिळाला. हा लोगो नोटांवर छापण्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. स्वच्छ भारत अभियानाचे बनवलेले बोधचिन्ह अशा पद्धतीने नोटांवर छापण्यात येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया अनंत खासबारदार यांनी यापूर्वी दिली होती. महात्मा गांधी यांच्या चष्म्याच्या वापर करत खासबारदार यांनी केलेले हे बोधचिन्ह देशपातळीवरील स्पर्धेत अव्वल ठरले होते.

Last Updated : Jan 31, 2021, 4:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.