ETV Bharat / state

Dragon Train Derailed : ड्रॅगन रेल्वे अचानक रुळावरून घसरली; पाच जण जखमी

कोल्हापूरातल्या पट्टणकोडोली येथे सुरू असलेल्या यात्रेमध्ये आलेल्या पाळण्यामधला एक ड्रॅगन रेल्वे ( Dragon train) सुरू असतानाच अचानक रुळावरून घसरून तुटल्याची घटना घडलीये. यामध्ये एकूण 5 ते 6 जण जखमी झाले असून एका महिलेचा चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली ( serious injury to woman face ) आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून यामध्ये काहींचा जीव वाचला आहे.

dragon train derailed
ड्रॅगन रेल्वे
author img

By

Published : Oct 17, 2022, 5:25 PM IST

कोल्हापूर : कोल्हापूरातल्या पट्टणकोडोली येथे सुरू असलेल्या यात्रेमध्ये आलेल्या पाळण्यामधला एक ड्रॅगन रेल्वे ( Dragon train) सुरू असतानाच अचानक रुळावरून घसरून तुटल्याची घटना घडलीये. यामध्ये एकूण 5 ते 6 जण जखमी झाले असून एका महिलेचा चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली ( serious injury to woman face ) आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून यामध्ये काहींचा जीव वाचला आहे.

ड्रॅगन रेल्वे अचानक रुळावरून घसरली

दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण : महाराष्ट्रासह राज्यभरातील भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला सध्या प्रारंभ झाला आहे. धनगर समाजाचे श्रद्धास्थान असलेल येथे विठ्ठल-बिरदेवाचे प्राचीन मंदिर आहे. यालाच बिरोबा असेही म्हणतात. बिरोबा हे पट्टणकोडोली गावचे कुलदैवत आहे. गावात दरवर्षी श्री विठ्ठल-बिरदेवाची यात्रा भरते. यात्रेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातून सुद्धा लाखोंच्या संखेने भाविक येतात. भंडाऱ्याची उधळण केली जात (explosion of Bhandara) असते.

भाविकांची मोठी गर्दी : यावर्षी भाविकांनी पट्टणकोडोलीमध्ये मोठी गर्दी केली ( Huge crowd of devotees ) आहे. दरम्यान या यात्रेमध्ये मोठ-मोठे आकाशचुंबी पाळणे, खाद्य पदार्थ, विविध प्रकरच्या साहित्य विक्रीसाठी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. काल रविवारी रात्री 10 च्या सुमारास येथे ड्रॅगन रेल्वेचा एक डब्बा अचानक निसटून तब्बल 10 फुटांवरून खाली पडला. दरम्यान येथे मोठा आवाज ही झाला यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एकूण 5 ते 6 जण जखमी झाले आहेत. यामध्ये अशोक दंडापुरे वयवर्षे 33, करेवा दंडापुरे वयवर्षे 27, मलकैज हनिमनुट्टी 24, सिद्धव्वा हनमट्टी 16, प्रितम अशोक दंडापुरे 5 अशी एकाच कुटुंबातील 5 जखमींची नावे आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.