कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात भीषण अपघाताची (terrible accident) घटना समोर आली आहे. येथील चंदगड गडहिंग्लज मार्गावर झालेल्या अपघातात दोन जीवलग मित्रांचा हृदयद्रावक शेवट (2 college friend death) झाला आहे. उसाच्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना, ट्रॉलीला धडकून खाली पडलेल्या दोन तरुणांना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडले आहे. या दुर्दैवी घटनेत दोन्ही तरुणांचा जागीचं मृत्यू झाला आहे.
जीवलग मित्रांचा मृत्यू -
सातवणे येथील जय जोतिबा मासरणकर (वय 18) आणि अजित आप्पाजी पाटील (19) या कॉलेज युवकांचा जागीच मृत्यू झाला. कॉलेजमधील जीवलग मित्रांचा अशा प्रकारे शेवट झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन घरी जात असताना झाला अपघात -
मिळालेल्या माहितीनुसार, जय मासरणकर आणि अजित पाटील हे आपल्या दुचाकी (क्र. एमएच 09- 9429) वरून अडकुरवरून इलेक्ट्रिक साहित्य घेऊन आपल्या सातवणे गावी येत होते. दरम्यान, आसगोळी पोल्ट्री फार्म जवळच्या एका अवघड वळणावर अडकुर हून ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना पुढच्या ट्रॉलीला हळुवार धडक बसताच दोघेही रस्त्यावर कोसळले. यावेळी नागणवाडीहून अडकुरच्या दिशेने जाणारा ट्रक (क्र. एमएच 04- ए –6168) दोघांच्याही अंगावरून सुसाट गेला. यावेळी दोघांच्याही डोक्यावरून ट्रकची चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, दोघांच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावसह परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा - boys Drowned : चिखलोली धरणात बुडून दोन अल्पवीयन मुलं बेपत्ता