ETV Bharat / state

Teachers Day २०२३ : माळावर नंदनवन फुलवलं; विद्यार्थ्यांनाही दिलं शेतीचं शिक्षण, 'त्या' शिक्षकाची प्रेरणादायी कहाणी - विद्यार्थ्यांना शेतीचे धडे

Teacher Day २०२३ Special Story : शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त ज्ञानी नाही तर, स्वावलंबी देखील बनवतात, याचा प्रत्यय कोल्हापूरमध्ये आलाय. या शिक्षकानं माळावर नंदनवन फुलवून विद्यार्थ्यांना शेती पिकवण्याचे धडे दिलेत. चला तर मग राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त आपण या शिक्षकाचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेवू या. (Teachers day 2023)

Teacher Success Story
विनय पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2023, 12:55 AM IST

Updated : Sep 5, 2023, 7:41 AM IST

विनय पाटील यांची प्रतिक्रिया

कोल्हापूर : गोरगरिबांच्या उन्नतीसाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्यानं, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व समाजासाठी शिक्षणाची कवाडं खुली केली. तळागाळातील घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून, सामाजिक न्याय क्रांती प्रस्थापित केली. छत्रपती शाहू महाराजांच्या या सामाजिक कार्याचा वारसा आजही श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसने प्रत्यक्ष कृतीतून जपलाय. संस्थेच्या 20 एकर पडीक जमिनीवर शेतीपीक, भाजीपाला, फळांची लागवड करून, बोर्डिंगमधील आणि संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अन्नधान्यात स्वयंपुर्ण बनविलं आहे. तसंच शेतीतून मिळणाऱ्या फायद्यातील लाखोची रक्कम गोरगरीब विद्यार्थ्यांच्या फी साठी दरवर्षी खर्च केली जातेय. ऑटो इंजिनिअरिंग या विषयातील किमान कौशल्य अभ्यासक्रमांतील शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि आवड म्हणून फोंड्या माळावरील संस्थेच्या शेतीत नंदनवन फुलवून विद्यार्थ्यांनाही शेती कशी पिकवावी, याचं बाळकडू देणाऱ्या कोल्हापूरातील विनय पाटील या शिक्षकाची राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त प्रेरणादायी यशोगाथा जाणून घेवू या.

मी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या महाराष्ट्र हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयात शेतीविषयक दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना माझे मार्गदर्शक विनय पाटील आणि श्रीराम परांजपे सरांनी शेतीविषयक दिलेल्या सखोल ज्ञानाचा आजही उपयोग होत आहे. शेतीविषयक दोन वर्षांचा कोर्स पूर्ण करून याच ज्ञानाच्या बळावर मी बीएससी एग्रीकल्चरपर्यंत शिक्षण घेऊन बागा व्यवस्थापन, रोपवाटिका ठिबक सिंचन या क्षेत्रात व्यवसाय करत आहे. - मिलिंद साखळकर(विद्यार्थी) वडगाव, कोल्हापूर

शिक्षणामुळे ऋणानुबंध कोल्हापूरशी जोडले : मूळचे गोटखिंडी, ता.वाळवा जिल्हा सांगलीचे असलेले विनय पाटील हे श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस संस्थेच्या ज्युनिअर कॉलेजमधील किमान कौशल्य विभागाकडे पूर्ण वेळ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षणामुळे त्यांचे ऋणानुबंध कोल्हापूरशी जोडले गेले. शिक्षक म्हणून काम करताना स्वतः परिपूर्ण व्हावं, यासाठी त्यांनी ऑटो इंजिनिअरिंग, एम. ए.(इतिहास), एलएलबी, डीबीएम, डी.पी.एम. या विविध पदव्या संपादन केल्यात. आपण काम करत असलेल्या शिक्षण संस्थेचे ऐतिहासिक महत्त्व आणि विचारधारा लक्षात घेता, आपल्यातील कौशल्याचा फायदा संस्थेला व्हावा, यासाठी संस्थाचालकांच्या परवानगीने करवीर तालुक्यातील हणबरवाडी येथील संस्थेच्या मालकीची २० एकर पडिक जमीनच सुजलाम सुफलाम करण्याचा निश्चय केला, तो पुर्णत्वासही आणला.

माळरान जमिन लागवडीखाली : सन २०१४ मध्ये मित्राचा बुलडोझर आणि संस्थेतील सहकाऱ्यांनी डिझेलसाठी केलेल्या आर्थिक देणगीच्या जोरावर कित्येक वर्षे पडिक, खडकाळ आणि काट्याकुट्याने भरलेली ही माळरान जमिन अथक प्रयत्नाने लागवडीखाली आणली. बोअरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली. ठिबक सिंचनातून ऊस, कलिंगड, कांदा, बटाटा, भाजीपाला, भात या पिकांसह फलोत्पादनही सुरू केलं उपलब्ध जमिन व पाण्यानुसार ठिकठिकाणी आंबा, चिक्कू, काजू, चिंच, आवळ्यासह सागवान आणि बांबूच्या शेकडो वृक्षांची लागवड केली. बांधावरील गवताच्या उपयोगातून गोपालन सुरु केलं. या शेतीतुन मिळणारा भाजीपाला तसेच धान्याचा, फळांचा उपयोग बोर्डिंगमधील तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांसाठी होतो. शिवाय गोपालनातील दुधाचा पुरवठाही विद्यार्थ्यांना केला जातो. या शेतीतून उत्पादित शेतमालाचे ग्राहक संस्थेचे शिक्षक, कर्मचारी आहेत. त्यामुळं दरवर्षी या शेतीतुन ८ ते ९ लाखांचे उत्पन्न मिळतंय. आतापर्यंत शेतीचा खर्च व उत्पन्न पाहता, नेहमीच फायदा झाला आहे. या शेतीतुन परिसरातील शेतमजूरांनाही रोजगार (lessons of farming to students) मिळालाय.

अभिनव उपक्रम : दरवर्षी शेतीतून मिळणाऱ्या निव्वळ नफ्यातील एक लाख रुपये संस्थेत शिक्षण घेणाऱ्या गोरगरिब विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी देण्यात यावे, असा ठरावच संस्थेने केलाय. त्यामुळं दरवर्षी याचा लाभ गोरगरीब विद्यार्थ्यांना होत आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० पर्यंत विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कर्तव्य पार पाडायचे. दुपारनंतर श्रमदानातून शेतीकाम, अशी दिनचर्या बनलेल्या विनय पाटील यांनी फोंड्या माळात फुलवलेली शेती इतरांना मार्गदर्शक बनलीय.

विद्यार्थ्यांना शेतीचे धडे : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज महाविद्यालयात शेतीविषयक अभ्यासक्रमाचा दोन वर्षांचा कोर्स आहे. कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीची कामे संस्थेच्या 20 एकर परिसरात शेतीवर स्वतः घेऊन जाऊन त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले जाते. यामुळं विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण होण्यास मदत मिळत आहे, महाविद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांनी यातून स्वतःचा व्यवसाय सुरू (Professor Vinay Patil) केलाय.

अनेक पुरस्कारांचे विनय पाटील मानकरी : 33 वर्षांच्या शैक्षणिक सेवेमध्ये शिक्षण क्षेत्रात विनय पाटील यांनी अमूल्य योगदान दिलंय. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राज्य शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय पुणे यांच्याकडून गुणवंत शिक्षक पुरस्कार, कविवर्य सूर्यकांत खांडेकर शिक्षक सेवा गौरव पुरस्कार, सकाळ माध्यम समूहाचा 'आयडॉल महाराष्ट्र गुरुवंदना पुरस्कार 2022' या पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात (Teachers day 2023) आलाय.

हेही वाचा :

  1. Teachers Elgar On Teacher Day: शिक्षक दिनाला 60 हजार शिक्षकांचा एल्गार, काळी फीत लावून शासनाचा निषेध करणार
  2. National Teacher Award : यंदा एकाच जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेला राष्ट्रीय पुरस्कार? मृणाल गांजाळे मानकरी
  3. Teacher Honor Award: राज्यातील 108 शिक्षकांच्या रखडलेल्या पुरस्कारांना मिळाला मुहूर्त; उद्या पार पडणार शिक्षकांचा सपत्नीक सत्कार सोहळा

Last Updated : Sep 5, 2023, 7:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.