ETV Bharat / state

उन्हाच्या तडाख्यात आपल्या पाळीव प्राण्यांची 'अशी' घ्या काळजी

सध्या वातावरणात होणाऱ्या तापमान वाढीचा त्रास मानवासह प्राण्यांनाही होत आहे. मार्च महिन्यापासून यंदा तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक पशुपक्ष्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. रखरखत्या उन्हामुळे प्राणी आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून उन्हामुळे सर्वात जास्त डिहायड्रेशन, गॅस्ट्रो, भूक मंदावणे यासारखे त्रास होत आहेत. अलीकडच्या काळात घरात एखादा प्राणी पाळण्याचे प्रक्रार हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रामुख्याने शहरी भागात वेगवेगळ्या प्रकारचे श्वान, मांजर पाळण्याचे ट्रेण्ड वाढला असून व्यवसायासाठी गायी, म्हशी, शेळ्या, कोंबडी तसेच अनेक पक्षी नागरिक पाळत असतात. मात्र, वातावरणात बदल झाले की प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकरचे आजार होत असतात या सर्व आजारांपासून आपल्या श्वानाची कशी काळजी घ्याल पाहा या 'ईटिव्ही भारत'च्या या विशेष रिपोर्टमधून...

पाळीव श्वान
पाळीव श्वान
author img

By

Published : Mar 30, 2022, 4:59 PM IST

कोल्हापूर - सध्या वातावरणात होणाऱ्या तापमान वाढीचा त्रास मानवासह प्राण्यांनाही होत आहे. मार्च महिन्यापासून यंदा तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे अनेक पशुपक्ष्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. रखरखत्या उन्हामुळे प्राणी आजारी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून उन्हामुळे सर्वात जास्त डिहायड्रेशन, गॅस्ट्रो, भूक मंदावणे यासारखे त्रास होत आहेत. अलीकडच्या काळात घरात एखादा प्राणी पाळण्याचे प्रक्रार हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रामुख्याने शहरी भागात वेगवेगळ्या प्रकारचे श्वान, मांजर पाळण्याचे ट्रेण्ड वाढला असून व्यवसायासाठी गायी, म्हशी, शेळ्या, कोंबडी तसेच अनेक पक्षी नागरिक पाळत असतात. मात्र, वातावरणात बदल झाले की प्राण्यांना वेगवेगळ्या प्रकरचे आजार होत असतात या सर्व आजारांपासून आपल्या श्वानाची कशी काळजी घ्याल पाहा या 'ईटिव्ही भारत'च्या या विशेष रिपोर्टमधून...

उन्हाच्या तडाख्यात आपल्या पाळीव प्राण्यांची 'अशी' घ्या काळजी

वाढत्या उष्णतेमुळे मानवासह पशुपक्ष्यांना ही त्रास - कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट आलेली आहे. मार्च महिना सुरू होताच माणसासह पशुपक्ष्यांना ही गर्मी चा त्रास होताना दिसत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तर तापमान 40 अंश सेल्सिअस उलटून गेले असल्याने नागरिकांचे पाय आता थंड पेयाकडे वळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला घरात पाळलेल्या आपल्या पाळीव पशु पक्ष्यांनाही या उन्हाच्या झळा बसत आहेत. उष्माघातामुळे हे प्राणी मोठ्या प्रमाणात आजारी पडत असून गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापुरातील जिल्हा पशुचिकित्सालय येथे मोठ्या प्रमाणात प्राणी उपचारासाठी येत आहेत. खरेतर उष्णतेच्या लाटेमुळे माणसांमध्ये उष्माघात अतिसार थकवा येणे, अशी लक्षणे दिसत असतात. अगदी तसेच तंतोतंत लक्षण पशुपक्षीमध्येही दिसत असतात. ऊनामुळे अनेक पशुपक्ष्यांना ताण येत असतो यामुळे श्वान शांत एकाजागी पडून राहणे किंवा विष्टा पातळ होणे, अशी लक्षणे आपल्याला दिसतात. मात्र, अगोदरच आपल्या पशुपक्ष्यांना उष्माघातापासून वाचविण्यासाठी आपण काळजी घेणे महत्त्वाचे असून उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा सुरू होतो यामुळे आपल्या श्वानांचे लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सहाय्यक आयुक्त डॉ. रवींद्र वडगावे यांनी सांगितले आहे. यामध्ये आपल्या श्वानास उनापासून बचाव करणे तसेच मुबलक प्रमाणात पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध करून देणे, तसेच थकवा जाणवू नये म्हणून नारळ पाणी, साखर पाणी किंवा गूळ पाणी दिल्यास आपल्या श्र्वानास थकवा जाणवणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

हिटस्ट्रोकच्या प्रमाणात वाढ - यावर्षी मार्च मध्येच एवढ्या मोठ्या प्रमाणत आपल्याला उन्हाळा जाणवू लागला आहे. या उन्हाचा परिणाम जास्त माणसावर होत आहे तसा जनावरांवरही होत आहे. गाय, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, कुत्री, मांजरी तसेच पोल्ट्री अशा सर्वांना सध्या उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवत असून हिटस्ट्रोकचे केसेस पशू रुग्णालयात जास्त येत असल्याचे डॉ. सॅम लुड्रिक यांनी सांगितले आहे. तसेच हा त्रास होण्याआधीच आपण आपल्या प्राण्याची कशा प्रकारे काळजी घ्यावी हे देखील त्यांनी सांगितले आहे.

शेळ्या, मेंढ्याची निगा कशी राखावी - शेळ्या, मेंढ्या जर उन्हात जास्त वेळ गेल्या तर उनामुळे त्यांच्यात तापमान वाढते. यामुळे त्यांचा गर्भपात होतो यामुळे भर उन्हात आपल्या शेळ्या व मेंढ्या यांना उन्हात फिरवू नये तसेच मोठ्या प्रमाणात स्वच्छ व शुद्ध पाणी त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी यावेळी दिला आहे.

मोठ्या जनावरांची निगा कशी राखावी - मोठे प्राण्यांमध्ये जर पाहायला गेले तर गाय, म्हशी व बैल यांच्या गोठ्यामध्ये योग्य तापमान ठेवणे अत्यंत गरजेचे असून गाय, म्हशी यांसारख्या जनावरांना मुक्त गोठा ठेवणे उत्तम असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. जनावरांना बांधून न ठेवता गोठ्यात मुक्त वावरण्यास सोडा. मुबलक प्रमाणात पाणी आणि विटामिन सी असलेले प्रोटीन द्या जेणेकरून स्वतःच्या शरीराचे तापमान हे ते स्वतः सुस्थितीत ठेवतील तसेच उन्हाळ्यात मोठ्या जनावरांत ऍसिटिक ऍसिडचे प्रमाण वाढते. यामुळे मोठ्या जनावरांना अपचनाचे प्रमाण जास्त दिसते. यामुळे त्यांना सकाळ-संध्याकाळ थोडेसे खायचा सोडा द्यावा आणि थंड वैरण घालण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे दुधाच्या उत्पादनात वाढ होते.

घरातील पाळीव प्राणी कुत्री मांजरी यांची निगा कशी राखावी - अलीकडच्या वर्षात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी घरात पाळली जात आहेत. यामध्ये प्रामुख्याने श्वान, मांजरी असून यामध्येही विविध जातीचे श्वान उपलब्ध नागरिक पाळत आहेत. मात्र, उन्हाळ्यात हिटस्ट्रोकमुळे मोठ्या प्रमाणात श्वान मांजरी आजारी पडत आहेत. अनेक जातींची श्वानांना व मांजरांना मोठ्या प्रमाणात केस असतात आणि उन्हाळ्यात त्यांच्या शरीराचे तापमान सुस्थितीत ठेण्यासाठी केस गळती होत असते. यामुळे उन्हाळ्यात जर हे केस काढून टाकले तर उत्तम राहिल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच आपल्या श्र्वानास उन्हात न बांधता त्यांना थंड ठिकाणी ठेवणे योग्य असून अनेक नागरिक आपल्या श्र्वानाना वातानुकुलीत जागेत बसवतात. मात्र, हे सर्वांनाच शक्य नसल्याने कमीत कमी एखादे स्वतः पाण्यात भिजवून ते थंड ठिकाणी ठेवून त्याच्यावर आपल्या शहरात बसवावे, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. तर उन्हाळ्यात आंघोळ न घालता महिन्यातून एकदा घालावे जेणेकरून जर आंघोळ घातली आणि त्यांचे शरीर संपूर्णपणे कोरडे न झाल्यास त्यांना त्वचेचा आजार उद्भवू शकतात, म्हणून नेहमी अंघोळ घालू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

पोल्ट्री फार्म व घरातील कोंबड्या ची निगा कशी राखावी - जिल्ह्यात अनेक शेतकरी पोल्ट्री फार्मचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. मात्र, उन्हाळ्यात उष्माघातामुळे अनेक कोंबड्या मृत्युमुखी पडत असतात. यामुळे आपल्या कोंबड्यांना थंड ठिकाणी ठेवले तसेच लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच मुबलक प्रमाणात थंड पाणी आणि विटामिन्स असलेले पाणी देणे गरजेचे आहे. या सर्वांमुळे प्राण्यांचे उन्हाळ्याचा त्रास न होता उन्हाळा सुसह्यपणे जाईल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - Jotiba Yatra 2022 : दोन वर्षानंतर जोतिबा चैत्र यात्रा; भाविकांना कोणतेही निर्बंध नाहीत - पालकमंत्री सतेज पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.