कोल्हापूर - एखाद्या गावाने मिळून ठरवले तर काहीच अशक्य नाही. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करण्याची ताकद एकतेमध्ये निर्माण होते. त्याचेच प्रत्यंतर आज कोल्हापूर जिल्ह्यामधील कागलमध्ये आले. कागलमध्ये सुमारे ४ हजार विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनेच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
यामध्ये विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरत संपूर्ण कागल काही तासांमध्ये चकाचक झाले. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ स्वतः या महास्वच्छता अभियानात सहभागी झाले होते. कागल नगरपरिषद आणि प्रशासनाच्यावतीने कागलमध्ये आज महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. कागल शहरातील जवळपास १४ ठिकाण निवडून त्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)