ETV Bharat / state

...तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही; स्वाभिमानीचा इशारा

ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली. यामुळे स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

ऊस
author img

By

Published : Nov 17, 2019, 3:10 PM IST

Updated : Nov 17, 2019, 3:24 PM IST

कोल्हापूर - ऊस दराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. तर, 23 नोव्हेंबरला होणाऱ्या स्वाभिमानीच्या ऊस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

ऊस दराबाबत बोलताना स्वाभिमानचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील आणि आमदार सतेज पाटील

ऊस दराबाबत तासभर झालेल्या बैठकीतील चर्चेत कारखानदारांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना समोर ठेवलेला प्रस्ताव अमान्य झाल्यानंतर बैठक फिस्कटली. एफआरपीचे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेनंतर पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यात बैठक होईल असे कारखानदारांनी सांगितले. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात संघर्षाची वेळ येणार नसल्याचेही सतेज पाटील म्हणाले.

हेही वाचा - शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करा : आमदार चंद्रकांत जाधव

हेही वाचा - कोल्हापुरातील हार्डवेअर दुकानाला मोठी आग; आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

Intro:अँकर- कोल्हापुरात ऊसदराबाबत कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यात सुरू असणारी बैठक फिस्कटली आहे. एफ आर पी चे तुकडे करण्याचा कारणावरून साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेत मतभेद झाल्याने या बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला आहे. तर 23 नोव्हेंबरला होणाऱ्या स्वाभिमानीच्या उस परिषदेत अंतिम निर्णय होईपर्यंत जिल्ह्यातील कोणताच साखर कारखाना सुरू करू देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.Body:व्हीओ : तर तासभराच्या झालेल्या बैठकीतील चर्चेत कारखानदारांनी स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांना समोर ठेवलेला प्रस्ताव अमान्य झाल्यानंतर बैठक फिस्कटली आणि बैठकीतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. कारखानदारांनी देखील शेतकरी संघटनेच्या ऊस परिषद नंतर पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार यांच्यात बैठक होईल असं कारखानदारांनी म्हटले आहे. तसच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात संघर्षाची वेळ येणार नसल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

बाईट - जालंदर पाटील (प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना)
बाईट -सतेज पाटील (आमदार)
Conclusion:.
Last Updated : Nov 17, 2019, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.