ETV Bharat / state

'आधीच्या सरकारने घेतला म्हणून निर्णय बदलणे आंधळेपणाचे ठरेल'

राज्यातील नवे सरकार चुकीच्या दिशेने जात आहे. केवळ आधीच्या सरकारने निर्णय घेतला म्हणून तो बदलणे आंधळेपणाचे ठरेल, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे.

राजू शेट्टी
राजू शेट्टी
author img

By

Published : Jan 23, 2020, 12:26 PM IST

कोल्हापूर - भाजप आणि शिवसेनेच्या युती सरकारने बाजार समितीतील संचालक मंडळ निवडीचा अधिकार शेतकऱ्यांना दिला होता. त्या निर्णयाचे आम्ही तेव्हा स्वागत केले होते. मात्र, राज्यातील नव्या महाविकास आघाडीच्या सरकारने हा निर्णय रद्द करण्याची आवश्यकता नव्हती, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण: सागर खोतवर गुन्हा दाखल करा

बाजार समितीतील संचालक मंडळ निवडीतील शेतकऱ्यांना दिलेला अधिकार रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तो निर्णय आम्ही मान्य करणार नाही. निवडणुकीचा खर्च वाचतो असे सांगून, पुन्हा बाजार समित्यांना राजकारण्यांच्या घशात घालायचे असेल किंवा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर आम्ही तसे होऊ देणार नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा... कोल्हापूर : मूरगूडमधून महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण

राज्यातील नवे सरकार चुकीच्या दिशेने जात आहे. केवळ आधीच्या सरकारने निर्णय घेतला म्हणून तो बदलणे आंधळेपणाचे ठरेल, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. व्यापाऱ्यांकडून होणारी लूट आणि शेतकऱ्यांची होणारी फसवणूक याबाबत सरकारने काय केले, असा सवालही शेट्टी यांनी केला. तसेच अशा प्रकारच्या निर्णयांनी महाराष्ट्राचे कृषी खाते कोलमडून पडल्याशिवाय राहणार नसल्याचेही राजू शेट्टींनी म्हटले आहे.

Intro:अँकर : युती सरकारनं बाजारसमितीतील संचालक मंडळ निवडीचा अधिकार शेतकऱ्यांना दिला होता, त्याचं स्वागत आम्ही केलं होतं. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारनं हा निर्णय रद्द करण्याची आवश्यकता नव्हती. हा निर्णय आम्ही मान्य करणार नाहीये. निवडणुकीचा खर्च वाचतो असं सांगून, पुन्हा बाजार समितीच्या राजकारण्यांच्या घशात घालायच्या असतील किंव्हा शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल तर सरकार चुकीच्या दिशेने जात आहे. केवळ आदीच्या सरकारनं हा निर्णय घेतला म्हणून हा बदलणे हे आंधळे पणाचे ठरेल. अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केलीये. दरम्यान, व्यापाऱ्यांकडून होणारी लूट आणि शेतकऱ्यांची होणारी फसवणूक याबाबत सरकारने काय केले असा सवाल करत अशाप्रकारच्या निर्णयांनी महाराष्ट्राचे कृषी खाते कोलमडून पडल्याशिवाय राहणार नसल्याचेही राजू शेट्टींनी म्हंटले आहे.

बाईट : राजू शेट्टी, माजी खासदारBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.