ETV Bharat / state

कोल्हापुरातील काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला गळती; मेघोलीची पुनरावृत्ती होणार नाही ? - मळोली धरण फुटी

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून काळम्मावाडी धरणाची धरणाची ओळख आहे. येथील दूधगंगा जलाशयाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धरणाच्या मोनोलीत १ ते ९ मध्ये गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मेघोलीसारीखी दुर्घटना घडल्यावर यांचे डोळे उघडणार का ? तर काळम्मावाडी धरण सुरक्षेसाठी जलसंपदा विभागाने तात्काळ ही गळती थांबवण्यासाठी उपाय योजना राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्ग आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पोवार यांनी केली आहे.

धरणाच्या मुख्य भिंतीला गळती
धरणाच्या मुख्य भिंतीला गळती
author img

By

Published : Sep 29, 2021, 9:54 AM IST

Updated : Sep 29, 2021, 1:31 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीची गळती वाढली आहे. सध्या धरणाच्या मुख्य भिंतीतून प्रती सेकंद १९० लिटर पेक्षा जास्त पाण्याची गळती होत असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मेघोली सारखी घटना घडल्यावरच जिल्हा प्रशासन जागे होणार का? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होऊ लागला आहे. जर भविष्यात धरणाच्या मुख्य भिंतीला तडा गेला तर आजूबाजूच्या वीस ते पंचवीस गावांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अस मते जाणकारांनी व्यक्त केले आहे. मात्र, त्याची गळती दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून सद्यस्थितीत धरणाला धोका नसल्याचा खुलासा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे.

काळम्मावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला गळती

कोल्हापूर जिल्ह्यतील सर्वात मोठे धरण म्हणून काळम्मावाडी धरण ओळखले जाते. मात्र धरणाच्या बांधकामाल बरीच वर्षे उलटून गेल्याने आता या धरणाच्या मुख्य भिंतीमधून गळती सुरू झाली आहे. प्रशासनाकडून गेल्या दहा वर्षांंपासून या धरणाची गळती दुरूस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप हे काम पूर्णत्वास गेले नाही. धरणाची गळती पूर्णपणे बंद करावी यासाठी नागरिकांनी वारंवार मागणी करण्यात येत आहे. अन्यथा या धरणाच्या गळतीमुळे बांधकाम कमकुवत होऊ न कालांतराने भिंत ढासळण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. १३५० मीटर लांबी असलेल्या धरणातील ४९० मीटरपर्यंतचे बांधकाम दगडी आहे. तसेच भितींच्या दोन्ही बाजूला मातीचे बांध आहेत. या ४९० मीटरच्या दगडी बांधकामावर ‘सिमेंट ग्राऊंटिंग’ केले जात आहे. मात्र, सद्य स्थितीत या भिंतीतून पाण्याची गळती सुरूच आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचा आंतरराज्य प्रकल्प म्हणून काळम्मावाडी धरणाची धरणाची ओळख आहे. येथील दूधगंगा जलाशयाच्या मुख्य भिंतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धरणाच्या मुख्य भिंतीबरोबर धरणाची गॅलरी, सांधे यासह धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धरणाच्या मोनोलीत १ ते ९ मध्ये गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मेघोलीसारीखी दुर्घटना घडल्यावर यांचे डोळे उघडणार का ? तर काळम्मावाडी धरण सुरक्षेसाठी जलसंपदा विभागाने तात्काळ ही गळती थांबवण्यासाठी उपाय योजना राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्ग आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पोवार यांनी केली आहे.

मुख्य भिंतीचे काम कमकुवत, गळती काढण्यासाठी खर्च पाण्यात-

सध्या या धरणातून प्रती सेकंद एकशे नव्वद लिटर गळती होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र मुख्य भिंतीतून येणारे पाण्याचे कारंजे बघितले तर गळतीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. यामुळे त्याची तात्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. धरण बांधणीपासून धरणाच्या मुख्य भिंतीचे बांधकाम कमकुवत झाले आहे, त्यामुळे ही गळती होत असल्याचा अंदाज या गळतीकडे पाहून व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या धरण शंभर टक्के भरले आहे. यामुळे गळतीचे प्रमाण वाढले आहे, ही बाब गंभीर आहे. यापूर्वी याच धरणाच्या भिंतीची गळती काढण्यासाठी धरणावरून होल मारून सिमेंट ग्राउटिंग, इफोक्सिंग ग्राउटिंग केले आहे. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. मात्र धरणाची आताची गळती बघितली तर गळती काढण्यासाठी केलेला खर्च पाण्यातच गेला असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष अजित पोवार यांनी सांगितले.

तर मेघोलीची पुनरावृत्ती होईल-

मागील महिन्यात भुदरगड तालुक्यातील मेघोली धरण फुटून झालेली दुर्घटना गंभीर आहे. या घटनेमुळे अनेक शेतकरी उद्ध्वस्त झाले असून काळम्मावाडी धरण फुटल्यावरच शासनाला जाग येणार का? असा सवाल पोवार यांनी उपस्थित केला आहे. जिल्ह्यातील मंत्री धरणातून कोल्हापूरला पिण्याचे पाणी नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र धरणाच्या गळतीकडे लक्ष नसल्याचा आरोपही पोवार यांनी केला. यामुळे दिव्याखाली अंधार असेच म्हणावे लागेल, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

प्रतिसेकंद २०० लिटर पेक्षा अधिक गळती

विश्वसनीय सूत्राकडून धरणातून प्रती सेकंद एकशे नव्वद लिटरची गळती असल्याचे सांगितले जाते मात्र प्रत्यक्षात ही गळती मोठ्या प्रमानात असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. २००९ साली धरणातून सुमारे प्रती सेकंद पाचशे लिटर पाण्याची गळती होती त्यानंतर गळती काढण्यासाठी उपाययोजना राबवली मात्र त्याला फारस यश आल नाही यामुळे या धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर आहे.

मेघोलीची पुनरावृत्ती होणार नाही ?
मेघोलीची पुनरावृत्ती होणार नाही ?

धरणाला धोका नसल्याचा जलसंपदा विभागाचा खुलासा-

दूधगंगा प्रकल्पांतर्गत मुख्य धरणाचे काम माहे जून -१९९९ अखेर पूर्ण झाले आहे. धरणाची एकूण लांबी १२८० मी ( माती धरण ७९० मी + दगडी धरण -४९० मी )आहे. धरणाची महत्तम ऊंची ७३,०८ मी इतकी
आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा २५.४० टीएमसी इतका आहे. नदी पात्रातील दगडी धरणाच्या ४८० मी लांबीमध्ये एकूण नऊ मोनोलिथ( कणे) आहेत. धरण पूर्ण झाल्यानंतर सन २०२० साली धरणामधील एकूण गळती ३९८ ली./सेकंद इतकी होती. दूधगंगा धरणासाठी (permissible leakage) ७० ली./सेकंद ( ड्रेन होल मधील गळती वगळून ) आहे. धरणातील गळती कमी करणेसाठी गळती प्रतिबंधक उपाय योजनेअंतर्गत सन २०१० ते २०१४ या कालावधीत मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना नाशिक यांनी दिलेल्या नकाशनुसार धरणाच्या मो नं. १ ते ९ मध्ये सीमेंट ग्राऊटिंगचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे धरणातील गळती कमी होऊन सन २०१५ साली ती ९० ली./सेकंद इतकी कमी झाली होती.

सन २०१५ ते २०२० या कलावधीत त्यामध्ये काही प्रमाणात वाढ होऊन चालू हंगामात सध्यस्थितीत ती १९० ली./सेकंद इतकी झाली आहे. धरणातील गळती कमी करणेच्या दृष्टीने अभ्यास करून उपाय योजना
सुचविण्यासाठी पुण्यातील सीडब्ल्यूपीआरएस (CWPRS PUNE) या तज्ञ संस्थेकडे विभागाच्या वतीने संपर्क करण्यात आला. तसेच या गळतीवर उपाययोजनेच्या अभ्यासाकरीता आवश्यक निधी सदर संस्थेस उपलब्ध करून दिला आहे.

पुण्यातील या संस्थेकडील तज्ञांनी ३१/०५/२०१९ रोजी धरण क्षेत्रास भेट देऊन धरणाची पाहणी केली. त्यानंतर अभ्यास अहवाल तयार करणेसाठी धरणामधील दगडी बांधकामात कोअर घेऊन त्याचे नमुने
तपासणीसाठी संस्थेकडे पाठविण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार धरणामध्ये बोअर होल घेण्याच्या कामासाठी निविदा निश्चित करून कामाचे आदेश देणेत आले आहेत. हे काम लवकरच हाती घेण्यात
येत आहे. या संस्थेकडून सीमेंट ग्राऊटिंग नकाशा व डिसाईन मिक्स Design mix याचा अभ्यास अहवाल प्राप्त होताच धरण गळती प्रतिबंधक कामे हाती घेण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास सादर करण्याचे नियोजन आहे. धरण पुनर्स्थापना व सुधारणा DRIP-II या कार्यक्रमांतर्गत दूधगंगा धरणाच्या दुरूस्ती कामाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सदर प्रस्तावामध्ये धरण गळती प्रतिबंधक कामाचा समावेश करण्यात आला आहे. सध्या धरणास कोणताही धोका नाही, अशी माहिती जलंसंपदा विभागाचे अभियंता अमोल निकम यांनी दिली.

हेही वाचा - मेघोली तलाव दुर्घटना, पहा ईटीव्ही भारत'वरील हे ड्रोनद्वारे केलेले चित्रण

हेही वाचा - मेघोली धरण दुर्घटना : दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी

Last Updated : Sep 29, 2021, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.