ETV Bharat / state

अमरावतीत अल्पवयीन प्रेमीयुगुलाची आत्महत्त्या - couple Suicide Mahadev Khori

महादेव खोरी परिसराजवळील जंगलात एका प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

couple Suicide Mahadev Khori
प्रेमीयुगुल आत्महत्या महादेव खोरी
author img

By

Published : May 20, 2021, 10:29 PM IST

अमरावती - महादेव खोरी परिसराजवळील जंगलात एका प्रेमीयुगुलाने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - केंद्र सरकारविरोधात बच्चू कडूंचे 'थाळी बजाओ' आंदोलन

दोघेही होते बेपत्ता

महादेव खोरी येथील महादेव मंदिरावरील वरच्या बाजूला जंगल परिसर असून, तेथील सागवानच्या एका झाडावर प्रेमीयुगलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेच्या माहितीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केल असता, आत्महत्या करणारे जोडपे अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आली. तीन दिवसांपासून ते बेपत्ता होते. यासंदर्भात फ्रेजरपुरा आणि राजापेठ पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार नोंदविण्यात आली होती.

तिन दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा अंदाज

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर प्रेमीयुगुल हे झाडावर गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. झाडेझुडुपातील अडचणीच्या ठिकाणी ही आत्महत्येची घटना घडल्याने पोलिसांनी घटनास्थळी पोहोचण्यात अडचण निर्माण झाली होती. त्यातच मृतदेहाची दुर्गंधी पसरल्यामुळे या प्रेमीयुगुलाने दोन ते तिन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी काढला. रात्री उशिरापर्यंत झाडावरील मृतदेह खाली काढण्याचे प्रयत्न सुरू होते.

हेही वाचा - नाली सफाईसाठी उच्च न्यायालयाची अमरावती महापालिकेला नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.