कोल्हापूर - उसाला तोड मिळत नसल्याने जिल्ह्यातील पूरग्रस्त गाव असणाऱ्या पाडळी खुर्द येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी थेट कोंडून घातले.
हेही वाचा - 38 वर्षांपासून आरोग्यादायी गुऱ्हाळ चालवणारा शेतकरी
माजी आमदार चंद्रदीप नरके अध्यक्ष असलेल्या या कारखान्याकडे गेल्या काही दिवसांपासून पाडळी खुर्द येथील शेतकरी ऊस तोड मागत होते. मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना कोंडून घेतले. यापूर्वीसुद्धा शेतकऱ्यांनी कारखान्याच्या पदाधिकारी आणि संचालकांना वारंवार सूचना दिल्या होत्या. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे शेतकरी आक्रमक झाले. दरम्यान येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत उसाला तोड न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा व प्रसंगी कारखान्याला टाळे लावण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.