ETV Bharat / state

युवा शेतकऱ्यानं एका गुंठ्यात घेतलं 3 टनापेक्षा जास्त ऊसाचं उत्पादन, जाणून घ्या काय केल्या उपाययोजना - युवा शेतकरी

Sugarcane Farm In Kolhapur : कोल्हापूरच्या शेतकऱ्यानं एका गुंठ्यात तब्बल 3 टन ऊसाचं उत्पादन घेतलं. या शेतकऱ्यानं तब्बल 18 गुंठ्यात 57 टन ऊस उत्पादन घेतलं आहे. त्यामुळं या शेतकऱ्याच्या बांधावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.

Sugarcane Farm In Kolhapur
उसाचं विक्रमी उत्पादन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 27, 2023, 3:30 PM IST

युवा शेतकऱ्यानं एका गुंठ्यात घेतलं 3 टनापेक्षा जास्त उसाचं उत्पादन

कोल्हापूर Sugarcane Farm In Kolhapur : युवा शेतकऱ्यानं एका गुंठ्याला तब्बल 3 टनापेक्षा ऊसाचं उच्चांकी उत्पादन घेऊन आदर्श उभा केला. उदय पाटील असं त्या युवा शेतकऱ्याचं नाव आहे. उदय पाटील हे पन्हाळा तालुक्यातील वाघवे गावातील रहिवासी आहेत. त्यांनी 18 गुंठ्यात तब्बल 57 टन ऊसाचं उत्पादन घेतलं. भुईमूग, मिरची, मेथी या आंतरपिकांतून सव्वा लाख रुपये त्यांनी मिळवले आहेत. 50 हजार रुपये खर्च वगळता सुमारे अडीच लाख रुपये 18 गुंठ्यात उदय पाटलांना निव्वळ नफा मिळाला आहे.

शेतामध्ये नवनवीन प्रयोग : पन्हाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वाघवे गावातील उदय पाटील हे युवा शेतकरी खासगी नोकरी करतात. ते नेहमी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. काही वर्षापूर्वी त्यांनी पाॉलीहाऊस शेती केली होती. याचाच अनुभव लक्षात घेऊन त्यांनी ऊस शेतीमध्येही नवनवीन प्रयोग करुन एका गुंठ्याला 3 टनापेक्षा अधिक विक्रमी ऊसाचं उत्पादन घेतलं आहे. उदय पाटील यांनी सुरुवातीला 18 गुंठ्यात 10 ट्रॉली शेणखत घालून उभीआडवी नांगरणी केली. तसंच दक्षिण उत्तर अशी चार फुटाची सरी सोडली. त्यानंतर 30 ऑगस्ट 2022 रोजी 86032 या जातीच्या ऊसाची दीड फूटावरती एकडोळा पद्धतीनं लागवड केली. त्यातून 18 गुंठ्यात तब्बल 57 टन ऊसाचं उत्पादन उदय पाटील यांनी घेतलं आहे.

भुईमूग आणि मिरचीचं घेतलं आंतरपीक : उदय पाटील यांनी आंतरपीक म्हणून भुईमूग आणि मिरचीची लागवड केली. तसंच ठिबक सिंचनानं पाणीपुरवठा करत भरणीपर्यंत नॅनोटेक हायटेक, बायोजेम याच्या दोन महिने आळवण्या केल्या. त्यानंतर बाळभरणी करून मेथीचंही पीक घेतलं. त्यानंतर वेगवेगळ्या खतांसह औषधांचा वापर करून पावरटेलरनं अंतिम भरणी केली. ऊसाची उंची सहा फूटाहून अधिक होईपर्यंत महिन्यातूंन दोन तीन टॉनिकच्या फवारण्या केल्या. तसंच 15 महिन्यात ऊसशेतामध्ये तणनाशकाचा वापर न करता वारंवार पावरटेलरनं नांगरणी करून भांगलण केली. त्यामुळं जोमानं ऊसाची वाढ होऊन 18 गुंठ्यात ऊसाचा डोंगर उभा राहिला.

तब्बल 57 टन ऊसाचं भरघोस उत्पादन : गेल्या काही दिवसांपूर्वीच या 18 गुंठ्यातील ऊसतोड करण्यात आली असून त्यांना तब्बल 57 टन ऊसाचं भरघोस उत्पादन मिळालं. आंतरपीकांचे सव्वा लाख रुपये आणि ऊसाचे अडीच लाख रुपये असं 18 गुंठ्यात तीन लाखाचं उत्पादन उदय पाटील यांनी मिळवलं. जवळपास 50 हजार रुपये खर्च वगळता त्यांना अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. तसंच इतर क्षेत्रामध्येही त्यांचं असंच उत्पादन असून उदय पाटलांना एकरी सुमारं 120 टनापेक्षा अधिक ऊसाचं उत्पादन मिळणार आहे. त्यामुळं याची दाखल घेवून दत्त दालमिया साखर कारखान्याचे युनिट हेड रंगाप्रसाद, शेती अधिकारी संग्राम पाटील, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊसक्षेत्राला भेट देवून उदय पाटील यांचं अभिनंदन केलं आहे. त्यामुळं उदय पाटील यांनी शेतीमध्ये कष्ट करून योग्य नियोजनाद्वारं शेती केल्यास चांगला फायदा मिळतो, हे दाखवून युवकांसमोर आदर्श घालून दिला आहे.

शेती अधिकारी बांधावर : कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी ऊसाचं उत्पादन मिळाल्यानं दत्त दालमिया कारखान्याचे युनिट हेड रंगाप्रसाद, शेती अधिकारी संग्राम पाटील, आदी अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघवेतील ऊसशेतीला भेट देवून उदय पाटील यांचं अभिनंदन केलं.

नोकरीच्या मागं न लागता शेतीत आधुनिक प्रयोग करा : "सर्वसामान्य मध्यमवर्गीय तरुण उच्च शिक्षण घेऊनही आज नोकरीच्या शोधात भटकत आहे. मात्र काळ्या मातीत आधुनिक प्रयोग करून नोकरीच्या मागं न लागता सकारात्मक पद्धतीनं शेतीकडं बघा, लाखांचा पोशिंदा मानला जाणारा शेतकरी आज जगभरातील मानव जातीचं पोट भरत आहे. त्याचा कुठंतरी आजच्या तरुण पिढीनं विचार करून शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिक शेती करावी" असा मोलाचा सल्ला उदय पाटील यांनी तरुणांना दिला आहे.

हेही वाचा :

  1. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी शासकीय वसतिगृहे; मुलांच्या हातातील कोयता सुटणार?
  2. ऊस उत्पादक शेतकरी साखरेच्या गोडव्यापासून वंचित!
  3. ऊस तोडणी कामगारांच्या कमतरतेमुळे सिंधुदुर्गात केवळ 30 टक्‍केच तोडणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.