ETV Bharat / state

कोल्हापुरातील 'या' छोट्याशा गावात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग - Successful experiment of strawberry farming in a small town in Kolhapur

युवराज बंडगर यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच ते एका शाळेत शिक्षकही होते. मात्र, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते नोकरीला होते. कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते बेरोजगार झाले. गावालगतच बोरपाडळे येथे त्यांची जवळपास 6 एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा शेतीमध्येच लक्ष देऊन उत्तम शेतकरी बनू असा निर्णय त्यांनी घेतला.

Successful strawberry farm in kolhpur
कोल्हापूरातील छोट्याशा गावात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग
author img

By

Published : Dec 12, 2019, 8:21 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. ऐकून नवल वाटलं ना? पन्हाळा तालुक्यातील नावली गावातील एका शेतकऱ्यांने आपल्या 4 गुंठे शेतात चक्क स्ट्रॉबेरीची लागवड केली. यानंतर ती यशस्वी सुद्धा करून दाखवली आहे. युवराज बंडगर असे शेतकऱ्याचे नाव आहे.

कोल्हापूरातील छोट्याशा गावात स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग

युवराज बंडगर यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. तसेच ते एका शाळेत शिक्षकही होते. मात्र, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते नोकरीला होते. कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते बेरोजगार झाले. गावालगतच बोरपाडळे येथे त्यांची जवळपास 6 एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा शेतीमध्येच लक्ष देऊन उत्तम शेतकरी बनू असा निर्णय त्यांनी घेतला. त्यात त्यांना काहीतरी वेगळे करायची सवय असल्यामुळे काही दिवसांपूर्वी ते मोबाईलवर व्हिडिओ पाहत होते. यावेळी त्यांना राजस्थानमधील शेतकऱ्यांने आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची शेती केल्याचे पाहिले. त्याच दिवशी बंडगर यांनी सुद्धा आपल्या शेतात स्ट्रॉबेरी पिकवायचा निर्णय घेतला.

हेही वाचा - पुण्यात ६७ व्या 'सवाई गंधर्व' महोत्सवाला आजपासून सुरुवात

यानंतर त्यांनी थेट महाबळेश्वर मधील एका शेतकऱ्याकडून स्ट्रॉबेरीची रोपे आणली. मुळातच शेतीची आवड असल्यामुळे बंडगर यांनी सप्टेंबर महिन्यात प्रायोगिक तत्वावर 4 गुंठयामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केली. स्ट्रॉबेरी म्हटले की थंड हवेचे ठिकाण डोळ्यासमोर येते. मात्र, पन्हाळ्यातील हवामानात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी खास इंटर डाऊन प्रजातीची रोपे आणली. लागवडीपासून आजपर्यंत त्यांना केवळ 15 ते 16 हजारांचा खर्च आला आहे. गेल्या 20 दिवसांपासून त्यातून त्यांनी उत्पन्न घ्यायलाही सुरुवात केली आहे. कमी क्षेत्रात लागवड केल्याने बंडगर सद्या शेताच्या शेजारीच असलेल्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालगत स्टॉल मांडून स्ट्रॉबेरीची विक्री करतात. आत्तापर्यंत त्यांना जवळपास 10 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. तर जवळपास सव्वा लाखांपर्यंतचे एकूण उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - आवक वाढल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले; ग्राहकांना दिलासा, तर शेतकरी हवालदिल

बंडगर यांनी ही शेती पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने केली आहे. यात कोणतीही रासायनिक खते किंवा कीटकनाशके वापरली नाही. शिवाय ठिबक पद्धतीने पाण्याचा वापर केल्याने पाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. बंडगर यांच्या स्ट्रॉबेरी शेतीची दखल कृषी विभागाने सुद्धा घेतली आहे. पन्हाला तालुक्यात सुद्धा स्ट्रॉबेरीची लागवड केली तर ती किफायतशीर ठरू शकते याचे उत्तम उदाहरण बंडगर यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या या शेतीच्या प्रयोगाचे अनेक शेतकऱ्यांना लाभ होईल, असा विश्वास सुद्धा कृषी सहाय्यक जे. के. खोत यांनी व्यक्त केला आहे.

सध्या पन्हाळा तालुक्यात ही स्ट्रॉबेरीची शेती कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे. सुरुवातीला विरोध करणारी लोकं आता या शेतकऱ्याची आणि स्ट्राॅबेरीच्या शेतीची स्तुती करत आहेत. युवराज बंडगर यांचा हा प्रयोग सर्वासाठी नवलाईचा असला तरी येथील पारंपरिक शेतीला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. मात्र, त्यासाठी आता शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची आणि कृषी विभागाच्या सहकार्याची गरज आहे.

स्पेशल रिपोर्ट : स्ट्रॉबेरी शेतीचा पन्हाळ्यातील छोट्याशा गावात यशस्वी प्रयोग

(एडिट केलेलं पॅकेज मोजोवरून पाठवले आहे, कृपया त्यामध्ये बाईट्स ची नावं add करा)

अँकर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. ऐकून नवल वाटलं ना? हो, पन्हाळा तालुक्यातल्या नावली गावातील एका शेतकऱ्यांनं आपल्या 4 गुंठे शेतात चक्क स्ट्रॉबेरीची लागवड केली असून ती यशस्वी सुद्धा करून दाखवली आहे. युवराज बंडगर असं या शेतकऱ्याचं नाव असून त्यांचा हा यशस्वी शेती प्रयोग पाहायला परिसरातले नागरिक गर्दी करतायेत... 

व्हीओ 1 : पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले युवराज बंडगर एका शाळेत शिक्षक होते. पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते नोकरीला होते. कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते बेरोजगार झाले. गावालगतच बोरपाडळे येथे त्यांची जवळपास 6 एकर वडिलोपार्जति शेती आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे लागण्यापेक्षा शेतीमध्येच लक्ष देऊन उत्तम शेतकरी बनू असा निर्णय त्यांनी घेतला. पण नेहमीच काहीतरी वेगळं करायची त्यांची सवय त्याप्रमाणे काही दिवसांपूर्वी मोबाईलवर व्हिडिओ पाहत असताना त्यांना राजस्तानमधल्या शेतकऱ्यांनं आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची शेती केल्याचे पाहिलं. मग त्याच दिवशी बंडगर यांनी सुदधा आपल्या शेतात स्ट्रॉबेरी पिकवायचा निर्णय घेतला आणि थेट महाबळेश्वर मधल्या एका शेतकऱ्याकडून स्ट्रॉबेरीची रोपं आणली... 

बाईट : 1) युवराज बंडगर, शेतकरी

व्हीओ 2 : मुळातच शेतीची आवड असल्यामुळे बंडगर यांनी सप्टेंबर महिन्यात प्रायोगिक तत्वावर चार गुंठय़ांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड  केली. स्ट्रॉबेरी म्हंटल की थंड हवेचं ठिकाण डोळ्यासमोर येतं.. पण पन्हाळ्यातील हवामानात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी खास इंटर डाऊन प्रजातीची रोपं आणली. लागवडीपासून आजपर्यंत त्यांना केवळ 15 ते 16 हजारांचा खर्च आलाय. गेल्या 20 दिवसांपासून त्यांना त्यातून उत्पन्नही मिळायला सुरुवात झालीये. कमी क्षेत्रात लागवड केल्याने बंडगर सद्या शेताच्या शेजारीच असलेल्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालगत स्टॉल मांडून स्ट्रॉबेरीची विक्री करतात. आत्तापर्यंत त्यांना जवळपास 10 हजारांचे उत्पन्न मिळालय..  जवळपास सव्वा लाखांपर्यंतचं एकूण उत्पन्न मिळेल असा त्यांना विश्वास आहे. 

बाईट : 2) युवराज बंडगर, शेतकरी

व्हीओ 3 : बंडगर यांनी ही शेती पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने केलीये. यात कोणतीही रासायनिक खतं किंवा कीटकनाशके वापरली नसल्याचं ते सांगतात. शिवाय ठिबक पद्धतीने पाण्याचा वापर केल्याने पाण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याचं ते सांगतात.

बाईट : 3) युवराज बंडगर, शेतकरी

व्हीओ 4 : बंडगर यांच्या स्ट्रॉबेरी शेतीची दखल कृषी विभागाने सुद्धा घेतली आहे. पन्हाला तालुक्यात सुद्धा स्ट्रॉबेरीची लागवड केली तर ती किफायतशीर ठरू शकते याचं उत्तम असं उदाहरण बंडगर यांनी दाखवून दिलं आहे. त्यांच्या या शेतीच्या प्रयोगाचे अनेक शेतकऱ्यांना लाभ होईल असा विश्वास सुद्धा कृषी सहाय्यक जे. के. खोत यांनी व्यक्त केलाय... 

बाईट : जे. के. खोत, कृषी सहाय्यक

व्हीओ 5 : सध्या पन्हाळा तालुक्यात ही स्ट्रॉबेरीची शेती कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरली आहे. युवराज बंडगर यांचा हा प्रयोग सर्वासाठी नवलाईचा असला तरी कोल्हापुरातील पारंपरिक शेतीला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. पण त्यासाठी आता गरज आहे ती शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची आणि कृषी विभागाच्या सहकार्याची. ईटीव्ही भारत कोल्हापूर..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.