कोल्हापूर - जिल्ह्यातील शिरोली येथे संतप्त पालकांनी शाळेवर दगडफेक केली आहे. शाळेतील शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा ग्रामस्थांनी ( SSC students suicide in Shiroli village ) आरोप केला आहे. पोलिसांनी कारवाई न केल्याने ग्रामस्थामध्ये संतापाची भावना आहे.
विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक आणि संस्थापकावर पोलिसात गुन्हा ( case against Symbolic International School ) दाखल केला होता. मात्र, तरीदेखील 1 एप्रिलपासून मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आज शिरोली ग्रामस्थांनी शाळेवर मोर्चा ( Shiroli villagers march on the school ) काढला. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागले. संतापलेल्या ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक करत ( Angry villagers in shiroli ) आपला रोष व्यक्त केला.
मुख्याध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या- शिरोली येथील सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूलमध्ये 10 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापकांच्या मानसिक छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे. तर या प्रकरणात सिमबॉलिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही अद्याप कुठलीच कारवाई झाली नाही. संतप्त झालेल्या पालकांसह ग्रामस्थांनी शाळेवर मोर्चा काढला होता. मात्र, या मोर्चाला काही कारणास्तव हिंसक वळण लागले. तर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेवर दगडफेक केली आहे. मात्र, मोर्चा असल्याने येथे अगोदरपासूनच पोलीस बंदोबस्तासह शाळेचे सुरक्षा रक्षक येथे तैनात करण्यात आले होते.
हेही वाचा-Grammy Awards 2022 : ग्रॅमीवर भारतीयांची छाप; फाल्गुनी शाह तर रिकी केज यांना मिळाला पुरस्कार
हेही वाचा-Nitin Raut Reaction : गिरगीटाप्रमाणे माणसंही रंग बदलतात; मंत्री नितीन राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा