कोल्हापूर - वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आठ दिवस लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 15 मे रोजी रात्री बारा वाजल्यापासून 23 मे रात्री 12पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊन काळात उद्योग, बँका, खासगी कार्यालय, किराणा आदी गोष्टी पूर्णपणे बंद असणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज सायंकाळी याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. जिल्ह्यात तब्बल 12 हजारांहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण असून 3 हजारांच्या आसपास रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे प्रशासनाने हा लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला आहे.
कोल्हापुरात 15 ते 23 मेदरम्यान कडक लॉकडाऊन; केवळ 'हेच' सुरू असणार - कोल्हापुरात कडक लॉकडाऊन
कोल्हापुरात 15 ते 23 मे दरम्यान कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात काय सुरू