ETV Bharat / state

तब्बल दीड महिन्यांनी धावली 'लालपरी', कोल्हापूर-पुणे मार्गावर एसटी सुसाट - एसटी सेवा सुरू

गेल्या दीड महिन्यापासून थांबलेली एसटीची चाके पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. तब्बल दीड महिन्यांनी लालपरी रस्त्यावर धावायला सज्ज झाली आहे. राज्य सरकारने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर आजपासून कोल्हापूर-पुणे बससेवा सुरू झाली आहे.

ST service resumes in Kolhapur
ST service resumes in Kolhapur
author img

By

Published : Jun 1, 2021, 3:00 PM IST

Updated : Jun 1, 2021, 3:13 PM IST

कोल्हापूर - गेल्या दीड महिन्यापासून थांबलेली एसटीची चाके पुन्हा एकदा सुरू झाली आहेत. तब्बल दीड महिन्यांनी लालपरी रस्त्यावर धावायला सज्ज झाली आहे. राज्य सरकारने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याच्या सूचना दिल्यानंतर आजपासून कोल्हापूर-पुणे बससेवा सुरू झाली आहे. सकाळपासून तीन फेऱ्या झाल्या असून प्रवास क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत ही बससेवा सुरू करण्यात आली आहे. एसटी सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला असून चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याचा आढावा घेतला ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी..

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ब्रेक द चेन या नियमानुसार लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये एसटी प्रवासाला बंदी घालण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील एसटी जवळपास दीड महिने बंद होती. जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे, तसतसे राज्यातील काही निर्बंध शिथिल केले आहेत. आजपासून राज्यातील लांब पल्ल्याच्या एसटी बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज कोल्हापूर-पुणे मार्गावर एसटी सेवा सुरू झाली आहे. राज्य शासनाच्य नियमानुसार प्रवाशी क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत तसेच प्रवाशांना मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. आज सकाळपासून कोल्हापूर विभागीय मंडळातून तीन फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती व्यवस्थापक अजय पाटील यांनी दिली. तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून देखील एसटी प्रवाशांना घेऊन आली असल्याचे पाटील यांनी सांगितले.

तब्बल दीड महिन्यांनी कोल्हापूर-पुणे मार्गावर धावली 'लालपरी'
सांगली, सोलापूर, सातारा, रत्नगिरीला बससेवेला सुरुवात -
प्रवाशी क्षमतेच्या 50% उपस्थितीत एसटीला लांब पल्ल्याच्या गाडीला प्रवास करण्यासाठी प्रवास मुभा देण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत प्रवासी 50 टक्केपर्यंत पूर्ण क्षमतेने भरत नाही, तोपर्यंत एसटी मार्गस्थ केली जात नाही. आज सकाळपासून सांगली, सोलापूर, सातारा, रत्नागिरी या जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे. मात्र कोल्हापूर आगारातून म्हणावा तसा प्रतिसाद अजून या जिल्ह्यांसाठी मिळत नसल्याने एसटी वाहतूक सुरू नाही. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद मिळत गेला तर नक्कीच बस सेवा सुरू करण्यात येईल, असे व्यवस्थापक पाटील यांनी सांगितले.
रोज १२०० फेऱ्या रद्द, कोट्यवधींचे नुकसान -
गेल्या दीड महिन्यापासून एसटीच्या प्रवासावर बंदी असल्याने कोल्हापूर विभागीय मंडळातील एसटीची चाके थांबली होती. दररोज बाराशे फेऱ्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेर विविध मार्गावर धावत होत्या. मात्र लॉकडाऊनमुळे रोज बाराशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे कोल्हापूर विभागीय एसटी महामंडळाचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

Last Updated : Jun 1, 2021, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.