कोल्हापूर - कारवाईच्या भीतीने जिल्ह्यातील एसटी चालकाने आत्महत्या ( ST employee suicide in Kolhapur ) केल्याची घटना घडली आहे. चालकाने राहत्या घरामध्येच गळफास लावून आत्महत्या केली आहे. धनाजी मल्हारी वायदंडे (वय 40 रा. नाधवडे, ता. भुदरगड) असे आत्महत्या ( Dhanaji Waydande suicide in Kolhapur ) केलेल्या एसटी चालकाचे जाव आहे.
गेल्या 12 वर्षांपासून धनाजी वायदंडे एसटी चालक म्हणून कार्यरत होते. त्यातील 8 वर्षांहून अधिक काळ ते येथील गारगोटी डेपोमध्ये कार्यरत होते. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपातसुद्धा ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना 5 जानेवारीला एसटी बस डेपोकडून नोटीस बजाविण्यात आली होती. ती नोटीस त्यांना आज 11 जानेवारी रोजी प्राप्त झाली होती. कारवाई होईल, अशी त्यांना भीती होती. तसेच संपामुळे प्रचंड आर्थिक विवंचनेत आल्याने त्यांनी ( Economic loss due to ST bus strike ) आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची भुदरगड पोलिसांत नोंद झाली आहे. कोल्हापूरातील इचलकरंजी येथील एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर आजही दुर्दैवी घटना घडली आहे.
हेही वाचा-Kishori Pednekar Critisized Kirit Somaiya : 'किरीट सोमैया म्हणजे तमाशातला गांजाडीया'
जिल्ह्यातील 71 कर्मचारी बडतर्फ-
गेल्या 2 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरणाच्या मागणीवरून संप सुरू ( ST Employees strike in Maharashtra ) आहे. तेव्हापासून आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 71 कर्मचाऱ्यांवर बडतर्फची कारवाई करण्यात आली ( ST administration action on employees ) आहे. यामध्ये 40 वाहक व 23 चालक आहेत. तर 6 यांत्रिकी आणि 2 प्रशासकीय विभागातील कर्मचारी आहेत. दरम्यान, संपात सहभागी झाल्यामुळे 214 जणांची तीन संधीद्वारे सुनावणी घेतली जात आहे. यामध्ये 145 जणांची तृतीय सुनावणी झाली आहे. तर 69 कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे एकूण 143 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणमीमांसा दिली आहे.
हेही वाचा-Lata Mangeshkar Corona Positive : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण
शरद पवारांच्या आवाहनालाही एसटी कर्मचाऱ्यांचा थंड प्रतिसाद
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत (MSRTC Strike ) तोडगा निघावा यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आवाहन केले. मात्र, आज ( 11 जानेवारी ) केवळ 356 एसटी कर्मचारी कामावर रुजू झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे एसटी संघटनांच्या सदस्यांनी, शरद पवार आणि परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याच्या केलेल्या आवाहनाला कर्मचार्यांकडून प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.