ETV Bharat / state

70 वर्षीय तरुण करतोय पाण्यावर तरंगणारी योगासनं; जाणून घ्या मोहन नातूंचे रहस्य

Special report of Mohan Natu : मानवी जीवनातील सर्वांगसुंदर व्यायाम म्हणजे पोहणे, दररोजच्या पोहण्यातून अनेक मानवी व्याधींना पूर्णविराम मिळाल्याची अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. त्यातील एक म्हणजे मोहन नातू हे उद्योजक पाण्यावर तरंगत योगासनं करतात. जाणून घ्या मोहन नातूंचे नेमके काय आहे रहस्य.

Special report of 70 year old man
पाण्यावर तरंगणारी योगासनं
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 11, 2024, 5:30 PM IST

कोल्हापूर : Special report of Mohan Natu अहमदनगरचे यशस्वी उद्योजक मोहन नातू यांना लहानपणापासूनच पोहण्याची नितांत आवड, दररोज न चुकता दीड ते दोन तास पोहण्याचा व्यायाम, गेली 40 वर्ष नित्यनियमाने पोहण्याचा सराव केल्यामुळे पाण्यावर तरंगणे साध्य झालं. यातूनच पाण्यावरील योगासनं साकारण्याची किमया केली आहे. नुकतेच ते कोल्हापूरला येऊन गेले यावेळी पाण्यावर तरंगणारी योगासनांची प्रात्यक्षिक पाहून अनेक कोल्हापूरकर अचंबित झाले, तरुणांनी पोहण्याकडं सकारात्मकतेनं पाहून पोहण्याला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा यासाठी नातू राज्यभर प्रचार प्रसार करत आहेत.

पाण्यावर तरंगणारी योगासनं

पोहणे अनिवार्य व्हावे यासाठी यापुढेही प्रयत्न : अहमदनगर येथे फॅब्रिकेशनचे व्यावसायिक असणारे मोहन नातू दहा वर्षांपूर्वीच व्यवसायातून निवृत्त झाले. लहानपणापासून पोहण्याची आवड असल्यामुळे दिवसातील दीड ते दोन तास ते जलतरण तलावात पोहण्यातच घालवतात. यातूनच गेल्या 40 वर्षांच्या पोहण्याचा सरावात पाण्यावर तरंगायचं कसं हे त्यांनी आत्मसात केलं. यातूनच पाण्यावर तरंगणारी योगासन ते गेली दहा वर्ष करत आहेत. जास्तीत जास्त तरुणांनी पोहण्याला दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा यासाठी मोहन नातू कोल्हापूर, नगर नाशिक महाबळेश्वर या ठिकाणी लोकांना एकत्र करून पाण्यावर तरंगणाऱ्या योगासनाची प्रात्यक्षिक करून दाखवतात. नुकतीच त्यांनी कोल्हापुरातील सर पिराजीराव घाटगे ट्रस्टच्या भवानी जलतरण तलावात ही प्रात्यक्षिक सादर केली यावेळी जमलेले कोल्हापूरकर अचंबित झाले. राज्यातील तरुणांच्या दैनंदिन आयुष्यात पोहणे अनिवार्य व्हावे यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असल्याचे मोहन नातू यांनी सांगितलं.

नातू करत आहेत 'ही' पाण्यावर तरंगणारी योगासन : वक्षविस्तारासन, वक्षविस्तारअर्धपद्मासन (दक्षणपद उजवा पाय), वक्षविस्तारअर्धपद्मासन (वामपद, डावापाय), शयनस्थितीत धनुरासन, जानूसंचालन दक्षिणपद, जानूसंचालन वामपद, वज्रासनात ज्ञानमुद्रा, सूक्ष वज्रासन, पूर्ण वज्रासन, पद्मासन, ताडासन, पद्मासन मानेखाली हात, भद्रासन, मस्त्ययान या प्रकारची योगासने सादर करतात, विशेष म्हणजे त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतलं नाही गेल्या 40 वर्षांच्या सरावामुळे ते पाण्यावर तरंगणारी योगासन सादर करत आहेत.

सोशल मीडियावर प्रात्यक्षिकांना उदंड प्रतिसाद : मोहन नातू राज्यभर पोहण्याचा प्रसार करत आहेत त्यासाठी त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. त्यांच्या स्वतःच्या यूट्यूब चैनल वर पाण्यावर तरंगणारी प्रात्यक्षिक पाहायला मिळतात यासोबतच अहमदनगर येथे रक्तपेढी तसेच दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यातील शहिदांच्या वीरपत्नींसाठी लाखांची मदत करून सामाजिक भान जपत आहेत.

हेही वाचा :

  1. रॅली काढून शक्तिप्रदर्शन भोवलं; सुनील केदार यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल
  2. शिवसेनेच्या निकालानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून जोरदार टीका, वाचा कोण काय म्हणाले?
  3. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दोन तासांचा वाहतूक ब्लॉक; कारण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.