कोल्हापूर : कोल्हापूरात नेहमीच काही ना काही हटके पाहायला मिळते. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून आता एक अशी लग्नपत्रिका व्हायरल ( Wedding card viral ) झाली आहे. ज्यामध्ये अगदी हटके आणि कोल्हापूरी स्टाईलमध्ये मित्रपरिवाराला लग्नाचे आमंत्रण देण्यात ( wedding invitation was given ) आले आहे. सुमित आणि श्वेता असे या नव्या जोडीचे नाव असून येत्या 27 नोव्हेंबर रोजी त्यांचे कोल्हापूरात लग्न होत आहे. त्यांच्या याच लग्नाची निमंत्रण पत्रिका आता गावभर व्हायरल झाली आहे.
![Wedding card viral](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16986511_wedding2.jpg)
काय म्हंटले आहे लग्नपत्रिकेत ? कोल्हापूरातील रांगडी भाषा या लग्न पत्रिकेतून दिसून आली आहे. ज्यामध्ये आमंत्रण देताना म्हंटले आहे की, 26 नोव्हेंबर ला म्हणजेच शनवारी 4 वाजता साखरपुडा हाय आणि सांच्याला 7 वाजता हळदी.. डीजे तेन सांगिटलाय. लोळून नाचूया.. तुम्ही फक्त वेळ काढून या.. 27 नोव्हेंबरला म्हणजे रव्वारी 1 वाजून मिंटाचा मुहूर्त काढलाय भडजीनं लग्नाचा. नाटकं सांगायची न्हाईत. गपगुमान यायचं. खर्च बी ढीग केलाय त्यामुळं इषयच न्हाई. जेवणा बिवनाची सोय हाय.. पत्ता माहित्या न्हवं ? पद्मपरी हॉल कळंब्यातला.. कत्यानीला जाताना ओ.. हा तिथंच हाय लगीन.. या बघा 100 टक्के वाट बघतो. आहेर काय आणू नका..