ETV Bharat / state

कोल्हापूर : फिरंगाई लसीकरण केंद्रावर नागरिकांचा गोंधळ; सोशल डिस्टन्सचा फज्जा - Firangai Vaccination Center rules disobey

कोल्हापूर शहरात कोरोना लसीचा तुटवडा असल्याने 11 पैकी नऊ लसीकरण केंद्रे बंद करून दोनच लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. फिरंगाई आणि सदर बाजार या ठिकाणी कोरोनाची लस उपलब्ध असल्याने शहरातील नागरिकांनी आज सकाळी या लसीकरण केंद्रांवर गर्दी केली.

social distance rules disobey Firangai Center
फिरंगाई लसीकरण केंद्र गोंधळ
author img

By

Published : Apr 8, 2021, 8:50 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर शहरात कोरोना लसीचा तुटवडा असल्याने 11 पैकी नऊ लसीकरण केंद्रे बंद करून दोनच लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. फिरंगाई आणि सदर बाजार या ठिकाणी कोरोनाची लस उपलब्ध असल्याने शहरातील नागरिकांनी आज सकाळी या लसीकरण केंद्रांवर गर्दी केली. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. उशिरापर्यंत रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने फिरंगाई तालीम लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातला.

फिरंगाई लसीकरण केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा होतानाचे दृष्य

हेही वाचा - सर्वोच्च न्यायालयात सत्याचा विजय झाला- चंद्रकांत पाटील

सांगली, सातारा नंतर आता कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना लसीचा तुटवडा भासत आहे. जिल्ह्यात पुढचे एक दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा शिल्लक आहे. केवळ १९ हजार ढोस शिल्लक आहेत. लसीची कमतरता असल्याने कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील अनेक लसीकरण केंद्रे बंद करण्यात आली आहेत. कोल्हापूर शहरातील 11 पैकी तब्बल 9 लसीकरण केंद्रे आजपासून बंद करण्यात आली आहेत. केवळ दोनच केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यामध्ये फिरंगाई तालीम व सदर बाजार येथील केंद्रांचा समावेश आहे. त्यामुळे, आज सकाळपासून नागरिकांनी या केंद्रांवर गर्दी केली.

केंद्र बंद झाल्याने लस घेण्यासाठी आलेल्यांची निराशा

अचानक लसीकरण केंद्र बंद झाल्याने लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची निराशा होत आहे. अनेक लोकांना सकाळी साडे नऊ पर्यंत लसीकरण केंद्रावर हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात लस उपलब्ध नसल्यामुळे त्यांना माघारी परतावे लागले. लस कधी येईल, याची कल्पना नसल्याने दोन दिवसानंतर संपर्क करा, अशा सूचना केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून लोकांना करण्यात येत आहे. मात्र, उशिरापर्यंत रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने फिरंगाई तालीम लसीकरण केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातला.

हेही वाचा - वकील साहेब शपथेवर बोलणं हा गुन्हा आहे, मनसेचा परबांना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.