ETV Bharat / state

हजारो भाविकांच्या उपस्थितीत शिरोळमध्ये रंगला मुकुट खेळ - पाहा व्हिडिओ

हालगीचा नाद आणि कैताळाचा आवाज, उतारीचा शिणगार याच्या संवादात शिरोळ तालुक्यातील उदगांव येथील श्री जोगेश्वरी देवीच्या यात्रेच्या तिसर्‍या दिवशी अकराशे वर्षांची परंपरा असलेला मुकुट खेळ हजारो भाविकांनी अनुभवला. मुकुटाला खिजवून पळत असलेला सवंगडी त्याच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा खेळ भाविकांनी आपल्या डोळ्यात टिपला. हा मुकुट खेळ पाहण्यासाठी उदगांवमध्ये भाविकांनी तुडूंब गर्दी केली होती.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 1, 2022, 3:22 PM IST

कोल्हापूर - हालगीचा नाद आणि कैताळाचा आवाज, उतारीचा शिणगार याच्या संवादात शिरोळ तालुक्यातील उदगांव येथील श्री जोगेश्वरी देवीच्या यात्रेच्या तिसर्‍या दिवशी अकराशे वर्षांची परंपरा असलेला मुकुट खेळ हजारो भाविकांनी अनुभवला. मुकुटाला खिजवून पळत असलेला सवंगडी त्याच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा खेळ भाविकांनी आपल्या डोळ्यात टिपला. हा मुकुट खेळ पाहण्यासाठी उदगांवमध्ये भाविकांनी तुडूंब गर्दी केली होती.

असा पार पडला मुकुटाचा खेळ ? - देशात विविध भागांमध्ये विविध सन, परंपरा असतात. आपापल्या परंपरेनुसार लोक ते साजरे करताना दिसतात. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील उदगाव येथेही मागील अनेक वर्षांपासून मुकुट खेळाची परंपरा आहे. गावातील यात्रेच्या वेळी हा खेळ खेळला जातो. मागील चार दिवसांपासून उदगांव येथे जोगेश्वरी यात्रा सुरू आहे. बुधवारी (दि. 1 जून) श्री जोगेश्वरी मंदिरातून देवीची मुकूटे सकाळी सहा वाजता बाहेर काढण्यात आली. एक नर, दोन मादीचे मुकुटे व सुपाचा मुकुटाच्या खेळाला सुरूवात झाली. प्रथम जोगेश्वरी मंदिर ते परटाच्या कमानीपर्यंत मुकुट खेळवण्यात आले. यात डोक्यावर मुकुट घेवून हातात वेताची काठी व पाठीमागे धारणारी व्यक्ती असते. यावेळी मुकुटाला खिदवून पळणार्‍या अनेक सवंगड्यांनी मुकुट धारकाच्या हातातील वेताच्या काठीचा मार झेलला. यात अनेक तरूण शालेय मुले, भाविकांनी मुकुट खेळून उत्साह वाढविला. त्यानंतर ग्रामपंचायत, गावचावडी, गणपती मंदिर, महादेवी मंदिरापर्यंत खेळ खेळविण्यात आले. त्यानंतर 12 च्या सुमारास मुकुटाकडून नारळ देण्यात आला. मुकुटासमोर जाऊन तरुणांनी मकुटाची काठी न घेता नारळ उचलल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. त्यानंतर धार्मिक विधी व मानपान झाल्यानंतर मुकुट खेळाची सांगता झाली. या मानपानानंतर मुकुटे श्री जोगेश्वरी मंदिराकडे नेऊन त्यांची मंदिरात स्थापना करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाचे व पोलीस ठाण्याचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा - Families Outcast Issue : वाळीत टाकण्याचा प्रकारच नव्हे, 'तो' तर भावकीतला वाद; खासदार धैर्यशील मानेंनी सोडवला वाद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.