ETV Bharat / state

नरेश भोरे आत्मदहन प्रकरण : इचलकरंजी नगरपरिषद बरखास्त करण्याची सेनेची मागणी - सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे आत्मदहन

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याने आत्मदहनाचा इशारा प्रशासनाला दिला होता. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांनी काल आत्मदहन केले.

Shiv sena
शिवसेना
author img

By

Published : Oct 27, 2020, 1:03 PM IST

कोल्हापूर - सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी काल (सोमवार) आत्मदहन केले. यात त्यांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेनेने इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत नगरपरिषद बरखास्त करण्याची मागणी केली. संबधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. प्रांताधिकारी विकास खरात यांना याबाबत निवेदन देण्यात आले.

इचलकरंजी नगरपरिषद बरखास्त करण्याची मागणी करताना मुरलीधर जाधव

नरेश भोरेंच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार -

इचलकरंजी नगर परिषदेमध्ये सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. याबाबत दररोज अनेक तक्रारी नगर परिषदेकडे येतात. मात्र, त्याकडे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. कचरा, साफसफाई, आरोग्य सुविधा या मूलभूत सुविधांचे तीन-तेरा वाजले आहेत. सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांनी या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यांच्या मृत्यूला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केला आहे.

सहाजणांवर गुन्हा दाखल -

सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या आत्मदहन प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आज पहाटे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला. 50 टक्क्यांहून अधिक भाजल्याने भोरे यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये खळबळ माजली आहे.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल -

इचलकरंजीचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाच्या कार्यासन विभागाचे प्रमुख दीपक पाटील, आराध्या एंटरप्राइजेस या स्वच्छता ठेका असणाऱ्या कंपनीचे ठेकेदार नगरपालिकेचे माजी सभापती मारुती पाथरवट, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दत्त संगेवार, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक मिसाळ, ठेकेदार कर्मचारी अमर लाखे यांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.

आत्मदहनाचे तत्कालीन कारण -

चार दिवसांपूर्वी इचलकरंजी येथील शहापूर रस्त्यावरून मेलेले डुक्कर घंटागाडीतून नेण्याऐवजी घंटागाडीला बांधून रस्त्यावरून फरफटत ओढून नेले जात होते. हा प्रकार सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे यांच्या निदर्शनास आला. त्यांनी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून मृत डुक्कर बांधून ओढत नेणाऱ्या घंटागाडी चालकास अटकाव केला. त्यावरून संबंधित गाडीचालकाने त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली होती. तसेच, त्याच्यावर दहशत निर्माण करून भोरे यांना चक्क मेलेले डुकर उचलून घंटागाडीत टाकण्यास भाग पाडले होते. या घटनेच्या निषेधार्थ भोरे यांनी संबंधितावर कारवाई व्हावी याबाबत निवेदन दिले होते. मात्र, कारवाई झाली नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याचीही दखल घेतली नसल्याने काल भोरे यांनी नगरपालिका परिसरातच अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.