ETV Bharat / state

शिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंकडून 'या' आहेत अपेक्षा - शिवाजी विद्यापीठ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के न्यूज

गेल्या काही काळात आरोप -प्रत्योरोपांमध्ये शिवाजी विद्यापीठाची बदनामी झाली. त्यावेळी केलेल्या चौकशीचे अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे आहेत. मात्र, अद्यापही अनेक दोषींना पाठीशी घालण्याचा आरोप अनेकांकडून होत आहे. अशा प्रकरणात विद्यापाठाचे नवे कुलगुरू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dr. Digambar Shirke
डॉ. दिगंबर शिर्के
author img

By

Published : Oct 8, 2020, 4:04 PM IST

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाचा कुलगुरूपदासाठी स्थानिक उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक ते प्र-कुलगुरू असा विद्यापीठाचा तीन दशकांचा प्रदीर्घ अनुभव असणारे डॉ. दिगंबर शिर्के यांची कुलगुरूपदी नियुक्ती झाली आहे. नूतन कुलगुरूंसमोर विद्यापीठाची प्रतिमा उंचावण्याचे आव्हान तर आहेच. याखेरीज सर्व विद्याशाखांमध्ये समन्वय ठेवून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि प्राध्यापकांच्या संशोधनाचा दर्जा वाढवताना त्यांचे प्रशासकीय कौशल्य पणाला लागणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंकडून अनेक अपेक्षा आहेत

कोरोना काळात लागणार कसोटी

सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने शैक्षणिक वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे. अशा काळात विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत कमी काळात गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक घडी बसवण्यासाठी नव्या कुलगुरूंना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना, प्राध्यापक वर्गाला विश्वासात घेऊन वाटचाल करावी लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा, प्रवेश या पहिल्या आव्हानाला कुलगुरूंना सामोरे जावे लागेल. गुणपत्रिका, परीक्षेतील अनागोंदी यामुळे मलिन झालेली विद्यापीठाची प्रतिमा सुधारावी लागणार आहे. विद्यापीठाला देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ बनवण्याचा मानस कुलगुरू डॉ. शिर्के यांनी व्यक्त केला आहे. यासाठी विद्यापीठाची तिजोरीही भक्कम असणे गरजेचे आहे. शासनाने विद्यापीठांना मर्यादीत खर्चात कामकाज करावे, अशा सूचना दिल्या आहेत. खर्चावर नियंत्रण ठेवून विकासाची कामे करणे हे कडवे आव्हान संख्याशास्त्रात निपुण असलेल्या कुलगुरूंपुढे आहे.

नवीन कुलगुरूंसमोरील अन्य आव्हाने -
शैक्षणिक वेळापत्रक, प्रशासनाची घडी बसवणे.
नॅक मूल्यांकनात आघाडी घेणे.
संशोधनाची व्याप्ती व संख्या वाढवणे.
पीएचडी विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण योग्य मार्गदर्शकांची नेमणूक करणे.
कर्मचाऱ्यांच्या ७व्या वेतन आयोगासाठी पाठपुरावा करणे.
विद्यार्थी, पालक, कर्मचारी,अधिकारी व संघटना यांच्याशी संवाद साधून योग्य समन्वय राखणे.
नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे.
नोकरभरती प्रक्रिया राबवणे.

मध्यंतरी विद्यापीठावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. चौकशी समिती तयार करून त्याचे अहवालही आले. मात्र, चुकीचे अहवाल सादर करून अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम मावळत्या कुलगुरूंनी केल्याचे आरोप होत आहेत. चौकशी समितीने दिलेले अहवाल याचिकाकर्त्यांना दिले जात नाहीत. शानबाग कमिटीने दिलेले अहवाल जाहीर करून दोषींवर कारवाई नवीन कुलगुरू करणार का? असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी केला आहे.

2010 ते 2015 या काळात तत्कालीन कुलसचिव मुळे यांनी गैव्यवहार केले. याच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती शानबाग यांची चौकशी समिती नेमण्यात आली. त्याचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाला आहे. मात्र, अद्याप त्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे आता नव्या कुलगुरूंनी न्याय द्यावा, अशी मागणी सिनेट सदस्य एस.जी.कुलकर्णी यांनी केली.

2018 साली पदवी प्रमाण पत्रातील सहीच्या घोळामुळे विद्यापीठाला लाखोंचा फटका बसला. केवळ कोणाच्यातरी हट्टापायी विद्यापीठ व विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. याच्या चौकशीचा अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे आहे. नव्या कुलगुरूंनी यात लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मनसे विद्यार्थी सेनेचे मंदार पाटील यांनी केली आहे.

महिला अत्याचाराबाबत अनेक निकाल प्रलंबित आहेत. त्याबाबतही चौकशी अहवाल विद्यापीठ प्रशासनाकडे आला आहे. मात्र, मागील कुलगुरू डॉ. शिंदे यांनी राज्यपालांना खोटा अहवाल सादर केला व दोषींना पाठीशी घातले. नव्या कुलगुरूंनी अहवाल जाहीर करून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी स्त्री अभ्यास केंद्राच्या मेधा नाणीवडेकर यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.