ETV Bharat / state

यंदा पन्हाळगडावर शिवज्योत नेण्यासाठी 'नो एन्ट्री'; नगराध्यक्षा रुपाली धडेल यांची माहिती - पन्हाळगड शिवजन्मोत्सव

19 फेब्रुवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. मात्र यंदा कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. त्यामुळे शिवभक्तांना पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यास परवानगी नसेल, अशी माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी दिली.

Shiva Janmotsav to be celebrated normally on Panhalgad amid coronavirus crisis
यंदा पन्हाळगडावर शिवज्योत नेण्यासाठी 'नो एन्ट्री'; नगराध्यक्षा रुपाली धडेल यांची माहिती
author img

By

Published : Feb 11, 2021, 8:50 AM IST

कोल्हापूर : 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवासाठी शिवभक्तांना पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यास परवानगी नसेल, अशी माहिती नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.

19 फेब्रुवारी रोजी अवघ्या महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाते. शिवजयंतीला अनेक गडकिल्ल्यांवरुन शिवज्योत नेली जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे दीर्घ काळ वास्तव्य असणाऱ्या ऐतिहासिक पन्हाळगडावरून देखील शिवज्योत घेऊन जातात. त्यासाठी कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर ,सांगली, सातारा, पुणे यासह इतर जिल्ह्यातून शिवभक्त ऐतिहासिक पन्हाळगडावर दाखल होत असतात.

यंदा पन्हाळगडावर शिवज्योत नेण्यासाठी 'नो एन्ट्री'; नगराध्यक्षा रुपाली धडेल यांची माहिती

यासोबतच, कर्नाटक राज्यातून बेळगाव, हुबळी, धारवाड, अथणी परिसरातून सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवभक्त शिवज्योत पेटवण्यासाठी पन्हाळगडावर येतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्हाळगडावर शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवभक्तांनी येऊ नये, असे आदेश नगराध्यक्ष रुपाली धडेल दिले आहेत. कोरोनाचा संसर्ग कमी असला, तरी त्याचे गांभीर्य ओळखून हा निर्णय घेतला असल्याचे धडेल यांनी सांगितले. शिवभक्तांनी पन्हाळगडावर न येत, आपल्याच गावी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करा, तसेच कोरोनापासून वाचण्यासाठी गर्दी न करता प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन धडेल यांनी केले आहे.

पन्हाळगडावर यंदा साध्या पद्धतीने साजरी होणार शिवजयंती..

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं सर्वाधिक काळ वास्तव रायगडानंतर याच पन्हाळगडावर झालं होतं. त्यामुळे शिवजयंती लोकोत्सव व्हावा या दृष्टीने पन्हाळा नगर परिषद प्रशासनाकडून मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात होती. मात्र यंदा कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. दरवर्षी करवीर संस्थापिका ताराराणी महाराणी साहेब यांच्या वाड्यासमोर शिवभक्तांचा मोठा मेळा भरलेला असतो. मात्र यंदा गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी पोलिस प्रशासनाला देखील पत्र देण्यात आले असल्याचे धडेल यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.