कोल्हापूर - पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यातच आता डिझेल आणि पेट्रोलचे दर आता शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारविरोधात शिवसेनेच्यावतीने सायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
सीबीएस ते दाभोळकर कॉर्नर सायकल रॅली -
कोल्हापूर शहरातील सीबीएस परिसरातील रावणेश्वर मंदिरापासून या सायकल रॅलीला सुरुवात झाली. तर दाभोळकर कॉर्नर या ठिकाणी या रॅलीची सांगता झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली सायकल रॅली काढण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिला सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.
मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी -
शिवसेनेने आयोजित केलेल्या सायकल रॅलीमध्ये शिवसैनिकांनी पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या रॅलीमुळे सीबीएस परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जोपर्यंत मोदी सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात वारंवार सरकारला जाग आणू, असा इशारा सुद्धा यावेळी शिवसैनिकांनी दिला.
हेही वाचा - शिमल्यातील बर्फवृष्टीचा नयनरम्य नजारा, पाहा व्हिडिओ