ETV Bharat / state

रावसाहेब दानवेंविरोधात शिवसेनेचे पायतान मारो आंदोलन

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील शिवसैनिकांनी पायतान मारो आंदोलन करत, दानवेंचा निषेध केला.

Shiv Sena's agitation in Kolhapu
दानवेंविरोधात शिवसेनेचे पायतान मारो आंदोलन
author img

By

Published : Dec 12, 2020, 6:01 PM IST

कोल्हापूर - केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील शिवसैनिकांनी पायतान मारो आंदोलन करत, दानवेंचा निषेध केला. दानवे यांना उपचाराची गरज आहे, त्यांचा उपचार आम्ही करू अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी दिली. कोल्हापूरच्या बिंदू चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

दानवेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी

रावसाहेब दानवे नेहमीच शेतकाऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असतात, आता सुद्धा त्यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांना चीन आणि पाकिस्तानमधून मदत मिळत असल्याचे वक्तव्य केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा अपमान झाला असून, त्याचा शिवसेना निषेध करते असं या आंदोलकांनी म्हटले आहे.

दानवेंविरोधात शिवसेनेचे पायतान मारो आंदोलन

महागाईच्या विरोधात निदर्शने

निवडणुकांमध्ये उद्योजकांकडून पैसे घेतले होते. ते पैसे कसे परत करायचे असा प्रश्न केंद्र सरकारला पडला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महागाई वाढवून हे पैसे जनतेकडून वसूल करत आहे. असा टोलाही यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी लगावला आहे. शेतकऱ्यांपासून नोकरदार आणि सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे हैराण झाले आहेत. त्यामुळे भाजप सरकारला आता खाली खेचणे गरजेचे झाले आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.