कोल्हापूर - सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले राजकीय भूकंप थांबायचे काय नाव घेत नाहीत. 3 वर्षापूर्वी तयार झालेल्या महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi ) मोठा सुरुंग लागला असल्याने राज्यात महाविकास आघाडी आहे का नाही हाच प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Shiv Sena leader Eknath Shinde ) यांनी भाजपच्या साथीने बंडखोरी करत पहिले 40 आमदार नेले तर आता त्यांची नजर ही शिवसेना खासदारांवर ( Shiv Sena MP ) ही पडली आहे. आणि या बंडात सहभागी झाले ते म्हणजे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक ( Kolhapur MP Sanjay Mandlik ). 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक शिवसेना खासदार म्हणून निवडून गेले. मात्र, त्यांनी लढवलेली निवडणूक ही खूप रोमांचकारी आहे.
सर्वात पहिली महाविकास आघाडी कोल्हापुरात - राज्यात महविकास आघाडी स्थापन होण्या अगोदर याची सुरुवात कोल्हापुरातून झाली. 2019 च्या निवडणुकीत संजय मंडलिक हे शिवसेनेकडून खासदारकीसाठी उभारले. तर त्यांच्या विरुद्ध होते ते म्हणजे राष्ट्रवादी कडून धनंजय महाडिक. दोन्ही ही प्रचंड राजकीय पार्श्वभूमी असलेले नेते. यामुळे ही निवडणूक चुरशींची होणार असे मानले जात होते. मात्र या सर्वात एन्ट्री झाली ती म्हणजे सतेज पाटील यांची. सतेज पाटील ( Satej Patil ) काँग्रेसचे एक दमदार नेते त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असल्याने अनेक ज्येष्ठ नेत्यांनी सतेज पाटील यांना महाडिक यांना मदत करण्याचे आवाहन केले. मात्र दोघांनमध्ये असलेली कटुता एवढी वाढली की सतेज पाटील यांनी उघडपणे आमचं ठरलय अशी टॅगलाईन चालवत शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार सुरू केला. यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) नाराज तर झाले. मात्र दुसरीकडे सतेज पाटील यांची मदत घेत तब्बल पाऊने तीन लाखांच्या फरकाने धनंजय महाडिक यांचा पराभव करत मंडलिक विजयी झाले.यानंतर धनंजय महाडिक यांनी भजपमध्ये प्रवेश केला.
दक्षिण विधानसभा निवडणुकीत मंडलिकांचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा - मात्र राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस ( Congress ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असताना ही कोल्हापुरात मात्र काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ( Nationalist Congress ) आणि शिवसेना असे चित्र पाहायला मिळत होते. बंटी उर्फ सतेज पाटील,हसन मुश्रीफ आणि संजय मंडलिक हे एकत्र आले तर धनंजय महाडिक हे भाजपमध्ये प्रवेश करून आणि युती असताना ही एकटे पडले. कोल्हापूर दक्षिणच्या ( Kolhapur South ) विधानसभा निवडणुकीत मंडलिक यांनी ही सतेज पाटील यांचे ऋण फेडण्यासाठी त्यांचा पुतण्या ऋतुराज पाटील यांना पाठिंबा देत आमदार केले. आणि यावेळी ही अमल महाडिक यांचा पराभव झाला. या सर्वात राज्यात ही मुख्यमंत्रीपदावरून युती तुटली आणि महविकास आघाडीची स्थापना झाली. या सर्व घडामोडीमध्ये एक खास म्हणजे महाविकास आघाडी म्हणून याची पहिली सुरुवात झाली ती म्हणजे कोल्हापुर जिल्ह्यात.
ज्यांना हरवले त्यांच्या सोबतच आता मंडलिक गेले - सतेज पाटील आणि संजय मंडलिक यांची मैत्री म्हणजे जय आणि विरू सारखी घट्ट होत गेली यानंतर त्यांनी जिल्ह्यातील राजकारणात अनेक बदल केले. मात्र आता राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे महविकास आघाडी कोसळली आणि भाजप आणि शिंदे गटाची सत्ता आली. या बंडात जिल्ह्यातील शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील येड्रावकर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. सध्या धनंजय महाडिक ही खासदार झाल्याने 2024 ला मंडलिक यांच्या समोर कोणताही तगडा उमेदवार नसल्याने भाजप शिवसेना मिळून तिकीट मलाच भेटणार हे विचार करत मंडलिक यांनी ही ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदेसोबत गेले. मात्र यामुळे ही गोष्ट ही सतेज पाटील यांना धक्कादायक होती. कारण सतेज पाटील यांनी संजय मंडलिक यांना निवडून तर आणले मात्र ज्यांना हरवले त्यांच्या सोबतच आता मंडलिक गेले आहेत. यामुळे आता जिल्ह्याच्या राजकारण पुढे कश्याप्रकारे वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा - National Herald Case: सोनिया गांधी आज 'ईडी'समोर होणार हजर, काँग्रेसकडून आंदोलनाची घोषणा