कोल्हापूर : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. कसबा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणतात. मात्र नकली शिवसेनाने जी त्यांनी तयार केली ते लवकरच काय आहे कळेल. दोन्ही मतदारसंघात महविकास आघाडीचा विजय होणार. पुढे कोठे ही निवडणूक होऊदे नकली शिवसेनेचा प्रभाव कुठेच दिसणार नाही. असे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
चोरांना चोरमंडळ म्हंटले: मी विधिमंडळला चोर नाही तर आली बाबा आणि त्यांच्या 40 चोरांना चोरमंडळ म्हंटले असे संजय राऊत म्हणाले. मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. मी विधिमंडळला चोर नाही तर आली बाबा आणि त्यांच्या 40 चोरांना चोरमंडळ म्हंटले आणि मी म्हणत राहणार आशा शब्दात संजय राऊत काल बुधवारी कोल्हापूरात केलेल्या शब्दावर ठाम राहिले. शिवाय लोक सुद्धा ही सर्वजण चोर आहे असेही राऊत यांनी म्हणत आज पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचले आहे. दरम्यान, प्रत्येक गोष्ट तुम्ही राजकीय दृष्ट्या पाहणार असाल तर मी लक्ष देणार नाही. मला मुंबईत घरी आणि ऑफिसला नोटीस आली मात्र मी अद्याप वाचले सुद्धा नाही असेही संजय राऊत म्हणाले.
आम्ही पण हक्कभंग दाखल केला : यावेळी संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री आणि उमुख्यमंत्री देखील विरोधी पक्ष नेत्यांना राजद्रोही म्हणतात. चहा पानाला गेले नाही म्हणून ते राजद्रोह म्हणतात. म्हणून आम्ही सुद्धा हक्कभंग दाखल केला. त्यामुळे चोर ते चोर वर शिरचोर असे सुरू आहे असेही संजय राऊत म्हणाले. नितेश राणेंवर बोलताना यावेळी संजय यांनी मला संरक्षण असेल तर काढा. असल्या फालतू धमक्या मला देऊ नका असे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवर हक्कभंगाची शक्यता : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हक्कभंगाचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवगर्जना यात्रे दरम्यान, विधिमंडळावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते विधीमंडळ नाही ते चोरमंडळ आहे, असे ते म्हणाले. ही बनावट शिवसेना आहे तसेच ते ड्युप्लिकेट चोरमंडळ आहे, असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या विधानावरून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गदारोळ झाला. त्यामुळे अनेकदा विधिमंडळाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. खासदार राऊतांच्या विधानाचे राज्यभर पडसाद उमटताना दिसत आहेत.