ETV Bharat / state

'शाहू जनक घराण्याची जनपंचायत'; समरजितसिंह घाटगे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर - शाहू जनक घराण्याची जनपंचायत उपक्रम कोल्हापूर

अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची गरज आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या बांधावरच जाऊन त्यांचे प्रश्न जाऊन घेणार असून येत्या 6 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. या दौऱ्याला 'शाहू जनक घराण्याची जनपंचायत' असे नाव देण्यात आले आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Nov 3, 2020, 4:22 PM IST

Updated : Nov 3, 2020, 4:36 PM IST

कोल्हापूर - कोरोनाचे कारण पुढे करत शेतकऱ्यांबाबतच्या सर्व जबाबदाऱ्या टाळू नका, अन्यथा शेतकऱ्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शाहू महाराजांच्या जनक घराण्याने राज्य सरकारला दिला आहे. शिवाय अनेक कारणांनी बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना आधार देण्याबरोबरच त्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी 'शाहू जनक घराण्याची जनपंचायत' या उपक्रमाअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बांधावरच जाणार असल्याचे समरजितसिंह घाटगेंनी म्हटले आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

समरजितसिंह घाटगे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर

यावेळी समरजितसिंह घाटगे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वच शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले आहेत, त्यामध्ये शेती व्यवसाय सुद्धा अपवाद राहिला नाही. अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसामुळे सुद्धा सर्वच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यावेळी सर्वच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची गरज आहे. त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या बांधावरच जाऊन त्यांचे प्रश्न जाऊन घेणार असून येत्या 6 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याचेही समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले. या दौऱ्याला 'शाहू जनक घराण्याची जनपंचायत' असे नाव देण्यात आले आहे.

'या' गावातून दौऱ्याला होणार सुरुवात

'शाहू जनक घराण्याची जनपंचायत' या जिल्हा दौऱ्याची येत्या 6 नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार असून करवीर तालुक्यातील चिंचवाड गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर सर्वात पहिले समरजितसिंह घाटगे जाणार आहेत.

या उपक्रमांतर्गत समरजितसिंह घाटगे खालील मुद्यांवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार -

1) शेतकरी कर्जमाफी - प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले होते. याला आता चार महिने उलटून गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सव्वा दोन लाखांपर्यंत आहे. पण हे सर्वजण या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. शिवाय महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. याबाबत सुद्धा सर्व शेतकऱ्यांकडून माहिती घेणार.

2 ) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची त्वरित भरपाई मिळावी - अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. अशा सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून त्यांच्या खात्यावर भरपाई जमा करावी. शासनाने जरी 10 हजार कोटींची मदत जाहीर केली असली तरी ती अतिशय तोकडी आहे, ती सुद्धा वाढवून मिळावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

3) टाळेबंदी काळातील सर्व वीजबिल माफ करावे तसेच वीज दरवाढ सुद्धा मागे घ्यावी - लॉकडाऊन काळात व्यवसायासह रोजगार गेल्याने आधीच सर्वजण अडचणीत सापडले आहेत. अशातच सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी शासनाने वीज दरवाढ करून जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे टाळेबंदी काळातील वीज बिले माफ करावीत, तसेच छुप्या पद्धतीने शासनाने विजेच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केली आहे, ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी याबाबत सुद्धा शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.

4) दूध दर वाढ मिळावी - शेतीला पूरक व्यवसाय म्हणून जिल्ह्यामध्ये दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, गाईच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये शासनाने कपात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. दूध वाढीसह दुधाला अनुदान मिळावे, या मागणीसाठी अनेक आंदोलने केली. मात्र, शासनाने आश्वासन देऊनही दूध व दूध पावडर अनुदानाची पूर्तता अद्याप झालेली नाही. पुन्हा गाईच्या दुधाच्या खरेदी दरात कपात केली आहे. त्यामुळे याकडे सुद्धा शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.

Last Updated : Nov 3, 2020, 4:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.