कोल्हापूर - मराठा आरक्षणा संदर्भात राज्य सरकारने जो मागावर्गीय आयोग स्थापन केला आहे, त्यावर शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय या आयोगात मराठा समाजाचा एकही प्रतिनिधी नसल्याने त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारने या आयोगामध्ये तातडीने मराठा समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्व दिले पाहिजे, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. एकीकडे सरकार शाहू-फुले-आंबेडकर आणि पुरोगामी विचाराने काम करत असल्याचे सांगत असतात आणि दुसरीकडे असे होत असेल तर मराठा समाजाचा अपेक्षा भंग होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवा मागावर्गीय आयोग सर्व समाजसमावेशक आहे का? -
आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत असताना शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी सरकारवर निशाना साधत मराठा समाजाचा अपेक्षा भंग केल्याचे म्हटले आहे. शिवाय मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हा जो नवा मागावर्गीय आयोग स्थापन केला आहे, तो शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी सर्व समाज समावेशक आहे का? असा प्रश्नसुद्धा त्यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे सरकार शाहू-फुले-आंबेडकर आणि पुरोगामी विचाराने काम करत असल्याचे सांगत असतात. मात्र, दुसरीकडे असे होत असेल तर हे योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सरकारने तातडीने या आयोगामध्ये मराठा समाजातील व्यक्तीला प्रतिनिधित्त्व दिले पाहिजे. जेणे करून खऱ्या अर्थाने याला सर्व समाज समावेशक, असे म्हणता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
यापूर्वीही केली होती मागणी -
समरजितसिंह घाटगे यांनी यापूर्वी सुद्धा नव्या मागावर्गीय आयोगाची स्थापना करण्यापूर्वीच यामध्ये योग्य व्यक्तीची निवड करावी, अशी मागणी केली होती. मात्र, आता नवा मागावर्गीय आयोग शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांनी सर्व समाज समावेशक आहे का, असे म्हणत त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती.
हेही वाचा - विनायक मेटे मराठा समाजाच्या हिताचे बोलत नाहीत, बाळासाहेब थोरातांचा पलटवार