ETV Bharat / state

कोल्हापुरात कोरोना रुग्णांना रोबो पोहोचवतोय औषधे! - कोल्हापूर कोरोना न्यूज

विजन चॅरिटेबल ट्रस्टने उभ्या केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये ही कार कार्यरत असून रुग्णांना औषध पुरवण्यापासून नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद घडवून आणत आहे. कोल्हापूर सायबर क्राईम विभागात काम करणाऱ्या अजय सावंत यांनी ही कार केवळ 2 दिवसात तयार केली आहे. ही कार रुग्णांना औषध पुरवण्यापासून नातेवाईकांशी व्हिडिओ कॉल द्वारे संवाद घडवून आणत आहे.

Robotic cars help Covid patients
रोबोटीक कार कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना करतेय मदत
author img

By

Published : May 11, 2021, 12:52 PM IST

कोल्हापूर - येथील कोव्हिड सेंटरमध्ये रोबोटिक कार रुग्णांना सेवा देत आहे. विजन चॅरिटेबल ट्रस्टने उभ्या केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये ही कार कार्यरत असून रुग्णांना औषध पुरवण्यापासून नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद घडवून आणत आहे. कोल्हापूर सायबर क्राईम विभागात काम करणाऱ्या अजय सावंत यांनी ही कार तयार केली आहे. याद्वारे आपला रुग्ण कसा आहे याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना घरबसल्या मिळणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी या सेंटरमधून उपचार घेऊन गेलेल्या कोरोना रुग्णांनी या वर्षी हे सेंटर उभे करण्यासाठी पुढाकार घेतलाय.

रोबोटीक कार कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना करतेय मदत

सुमारे दीडशे रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर -

'व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट'च्यावतीने गेल्या वर्षी कोल्हापूरातील सायबर कॉलेज येथे जवळपास 150 रुग्णांसाठी अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारण्यात आले होते. काही 5-6 अपवाद वगळता जवळपास 1 हजार 200 हुन अधिक रुग्णांना या कोव्हिड सेंटरचा आधार मिळाला होता. त्यातून सर्वजण ठणठणीत बरे होऊन घरी गेले होते. त्यांच्या या सेंटरला कोल्हापूरातील मोरया हॉस्पिटलच्या डॉ. संगीता निंबाळकर यांचा सुद्धा या कोव्हिड सेंटरला मोठा हातभार लागला आहे. आपले स्वतःचे हॉस्पिटल सांभाळून त्या या ठिकाणी मोफत उपचार देत आहेत. त्यामुळे यावर्षी सुद्धा आपल्या हातून सामाजिक सेवा घडावी या हेतूने व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी घोरपडे यांनी ठरवले होते. त्यानुसार पुन्हा एकदा 150 बेडचे अद्ययावत कोव्हिड सेंटर सुरू झाले असून. यावर्षी दाखल झालेले पहिलेच 15 रुग्ण कोरोनावर मात करून आपल्या घरी परत गेले आहेत.

अनोख्या शक्कलीतून बनवली रोबोटिक कार -

यावर्षी या कोव्हिड सेंटर मध्ये मनुष्यबळ कमी लागावे यासाठी अनोखी शक्कल लढवून एक रोबोटिक कार बनविण्यात आली आहे. ही कार रुग्णांना औषध पुरवण्यापासून नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद घडवून आणत आहे. अनेकजण कोव्हिड सेंटरमध्ये आपले नातेवाईक कसे आहेत. याबाबत चौकशी करण्यासाठी येत असतात. मात्र आता त्याच नातेवाईकांना आपल्या रुग्णांशी घरबसल्या व्हिडिओद्वारे संवाद साधता येणार आहे.

केवळ 2 दिवसात कार बनवून सेंटरला -

एवढेच नाही तर सर्व खोल्यांमध्ये ही रोबोटीक कार जाऊन तेथील रुग्णांना हवी असलेली औषधे पोहोचवू शकत आहे. त्यामुळे रुग्णांच्या थेट संपर्कात येणे सुद्धा काही प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ही रोबोटीक कार कोल्हापूर सायबर क्राईम विभागात काम करणाऱ्या अजय सावंत यांनी तयार केली आहे. केवळ 2 दिवसात त्यांनी ही कार बनवून सेंटरला दिली आहे.

सेंटरमध्ये उपचार घेऊन गेलेल्या रुग्णांचा हातभार -

गेल्या वर्षी जवळपास 1200 हुन अधिक रुग्ण या सेंटरमधून बरे होऊन परत गेले होते. त्यामध्ये पत्रकार, पोलीस, राजकीय व्यक्ती, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आशा अनेक व्यक्तींचा समावेश होता. त्यामुळे त्यांचे या सेंटरशी एक जिव्हाळ्याचे नाते बनले होते. म्हणूनच यावर्षी त्यातील अनेकांनी एकत्र येऊन पुन्हा कोव्हिड सेंटर सुरू करण्यासाठी हातभार लावला आहे. त्याचे विशेष कौतुक होत आहे.

हेही वाचा - 'टॉमी'ला 'कुत्रा' म्हणणं पडलं महागात; दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी.. व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.