ETV Bharat / state

खतांच्या वाढलेल्या किंमती कमी करा.. खासदार धैर्यशील माने यांची केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे मागणी

कोरोनाच्या काळात रासायनिक खतांच्या किंमती वाढल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या वाढलेल्या रासायनिक खतांच्या किंमती तात्काळ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे.

author img

By

Published : May 18, 2021, 5:18 PM IST

Dhairyashil Mane on chemical fertilizer
Dhairyashil Mane on chemical fertilizer

कोल्हापूर - कोरोनाच्या काळात रासायनिक खतांच्या किंमती वाढल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे या वाढलेल्या रासायनिक खतांच्या किंमती तात्काळ कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे. खते व रसायने मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांचेकडे त्यांनी ही पत्राद्वारे मागणी केली आहे.

Dhairyashil Mane on chemical fertilizer
खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेले पत्र
दरवाढ कमी करून शेतकऱ्यांना दिला द्या -
खासदार माने यांनी केंद्रीय खते व रसायने मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, रासायनिक खतांच्या किमतीत ७०० ते ८०० रुपयांची वाढ झालेली आहे. गेल्या दीड वर्षापासून शेतीची कामे जरी सुरु असली तरी बाजारपेठा बंद असल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. सध्याची रासायनिक खतांच्या किमंतीची वाढ ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही. खताच्या किमंती वाढू लागल्याने उत्पादन खर्चात वाढ होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. रासायनिक खतांचे दर वाढत असल्याने उत्पादन खर्च अधिक होणार आहे. इंधनाचे दर वाढल्यानंतर आता खतांचे दर वाढल्याने शेतकरी नाराज झाले आहेत. त्यामुळे खतांचे दर कमी करुन कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी विनंती सुद्धा खासदार धैर्यशील माने यांनी या पत्रातून केली आहे.
रासायनिक खतांच्या दरामध्ये खालील प्रमाणे वाढ झाली आहे -

Dhairyashil Mane on chemical fertilizer
खतांच्या किमतीचा चार्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.