कोल्हापुर - रिझर्व्ह बँकेने पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) निर्बंध घालत बँकेचे सर्व व्यवहार थांबविले आहेत. आरबीआयने कलम '35 अ' अंतर्गत पुढील ६ महिन्यांसाठी पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार बंद केले आहेत. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांची चिंता वाढली आहे.
हे ही वाचा - पीएमसी बँकेवर कारवाईचा बडगा, ६ महिन्यांसाठी आरबीआयने व्यवहार थांबवले
पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार अचानक ठप्प झाल्याने कोल्हापुरात बँकेसमोर ग्राहकांनी गर्दी केली. खातेधारकांना आपल्या खात्यातून फक्त एक हजार रुपये इतकीच रक्कम काढता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरबीआयने निर्बंध घातल्याने पीएमसी बँकेचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे नवीन कर्ज देणे, बँकेत डिपॉझिट असे व्यवहार पुढील सहा महिने करता येणार नाही.
हे ही वाचा - पीएमसी बँकेवर 'आरबीआय'कडून निर्बंध, मुंबईत बँक शाखेबाहेर लोकांची गर्दी
बँकेच्या ग्राहकांना एसएमएसद्वारे याची माहिती देण्यात आली आहे. बँकेचा एसएमएस मिळताच खातेधारकांमध्ये एकच खळबळ उडाली. आरबीआयने 35 अ अंतर्गत पीएमसी बँकचे सर्व व्यवहार बंद केले असून आरबीआयने काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, बँकेच्या खातेधारकांना १ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढता येणार नाही. बँकेला कर्ज वितरण करता येणार नाही. तसेच कर्जाचे नूतनीकरण सुद्धा करता येणार नाही. या सगळ्या प्रकारामुळे खातेधारकांनी बँकेच्या बाहेर गर्दी करत गोंधळ केला आहे.
हे ही वाचा - पीएमसी बँकेच्या संदर्भात आरबीआय व अर्थ मंत्रालयाशी संपर्क सुरू आहे - किरीट सोमय्या