कोल्हापूर - दुधाला दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी १ वाजता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा नेण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या नियम धाब्यावर बसवून स्टेट बँक चौकातून मोर्चा निघणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.
'लॉकडाऊनचा नियम स्वाभिमानी बसवणार धाब्यावर, उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा' - अहमदनगर दूध अनुदान न्यूज
राज्यातील दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन शेतमजूर असून, लॉकडाऊनमुळे त्याचा रोजगार गेला आहे. १७ ते १८ रुपये इतक्या कमी दराने व उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत त्याला दूध विकावे लागत आहे. त्यामुळे दुधाला भाव मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
!['लॉकडाऊनचा नियम स्वाभिमानी बसवणार धाब्यावर, उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा' राजू शेट्टी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8473167-224-8473167-1597816778149.jpg?imwidth=3840)
राजू शेट्टी
कोल्हापूर - दुधाला दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गुरुवारी (२० ऑगस्ट) दुपारी १ वाजता अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा नेण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या नियम धाब्यावर बसवून स्टेट बँक चौकातून मोर्चा निघणार असून, शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.
'लॉकडाऊनचा नियम स्वाभिमानी बसवणार धाब्यावर, उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'
'लॉकडाऊनचा नियम स्वाभिमानी बसवणार धाब्यावर, उद्या अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'
Last Updated : Aug 19, 2020, 12:03 PM IST