ETV Bharat / state

कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरण: सागर खोतवर गुन्हा दाखल करा

शेतकऱ्यांनी आणि आत्महत्या केलेल्या तरूणाच्या कुटुंबीयांनी थेट सागर खोतवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न बघता तातडीने सागर खोतवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
author img

By

Published : Jan 22, 2020, 8:50 PM IST

कोल्हापूर - कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात अनेक तरुण शेतकऱ्यांचे पैसे गुंतले आहेत. अनेकांचे संसार उद्धस्त होऊनही 'महारयत अ‌ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'तील संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रकरणातील सूत्रधारासह साथीदारांवर वेळीच कठोर कारवाई न झाल्यास प्रशासनाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

सागर खोतवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील प्रमोद जमदाडे या तरुणाने मंगळवारी आत्महत्या केली. कडकनाथ कोंबड्यांच्या व्यवसायात गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. शेतकऱ्यांनी आणि आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांनी थेट सागर खोतवर फसवणुकीचे आरोप केले आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न बघता तातडीने सागर खोतवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली.

हेही वाचा - मुंबई २४ तास' योजनेला मंत्रिमंडळाची मंजूरी - आदित्य ठाकरे
घोटाळा करणारा कितीही मोठा असला तरी त्याच्या मुसक्या आता आवळल्याच पाहिजेत. नाहीतर पोलिसांच्या आणि एकूणच सरकारच्या वर्तनाबद्दल संशय घ्यायला कुठेतरी जागा निर्माण होईल, असेही शेट्टी म्हणाले.

Intro:अँकर : कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात अनेक तरुण शेतकऱ्यांचे गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे गुंतले आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त होऊनही महारायत ऍग्रोच्या संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. सुत्रधारसह साथीदारांवर वेळीच कठोर कारवाई न झाल्यास प्रशासनाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.. कोल्हापूरातल्या पन्हाळा तालुक्यातील प्रमोद जमदाडे या तरूणाने मंगळवारी आत्महत्या केली. गुंतवलेले पैसे परत मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी आता शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत न बघता तातडीने सागर खोतवर गुन्हा दाखल करावा. अशी मागणी राजू शेट्टींनी केलीये. शेतकऱ्यांनी व आत्महत्या केलेल्या तरूणाच्या कुटुंबियांनी थेट खोतवर आरोप केला आहे. घोटाळा करणारा कितीही मोठा असला तरी त्याच्या मुसक्या आता आवळल्याच पाहिजेत. नाहितर पोलिसांच्याच आणि एकूणच सरकारच्या वर्तनाबद्दल संशय यायला कुठेतरी जागा निर्माण होईल असेही शेट्टींनी म्हंटले आहे.

बाईट :राजू शेट्टी, माजी खासदारBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.