कोल्हापूर: महापुरुषांची तुलना करण्यावरुन राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. राहुल गांधी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत करणारी पोस्ट काँग्रेस पार्टीच्या ऑफिशियल प्रोफाईल वरून प्रसारित केल्याच्या निषेधार्थ, भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली आहे. तसेच ट्विटर हँडलवरील पोस्ट तात्काळ हटवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर युगपुरुष छत्रपती शिवरायांशी तुलना करणारी पोस्ट प्रसारित करण्यात आली आहे. या पोस्टमुळे छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. तर राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागावी आणि ही वादग्रस्त पोस्ट हटवावी अशी मागणी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली. आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात राहुल गांधी यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. सार्वजनिक व्यासपीठावर कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव न घेतलेल्या राहुल गांधी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का? असा सवाल यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
-
एक-एक करके सब गढ़ जीते,
— Congress (@INCIndia) May 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
हर दुश्मन से लड़ रण जीते...🔥 pic.twitter.com/fk7l8FD6uh
">एक-एक करके सब गढ़ जीते,
— Congress (@INCIndia) May 23, 2023
हर दुश्मन से लड़ रण जीते...🔥 pic.twitter.com/fk7l8FD6uhएक-एक करके सब गढ़ जीते,
— Congress (@INCIndia) May 23, 2023
हर दुश्मन से लड़ रण जीते...🔥 pic.twitter.com/fk7l8FD6uh
पोस्टमुळे छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. राहुल गांधी यांनी तात्काळ माफी मागावी आणि ही वादग्रस्त पोस्ट हटवावी - भाजप कार्यकर्ते
राहुल गांधी महिलेकडून पराभूत: उत्तर प्रदेशातील अमेठी हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे. स्वातंत्र्यानंतर ही काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते या मतदारसंघातून निवडून आले. मात्र 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला. एका महिलेकडून गांधी यांना पराभव स्वीकारावा लागला, त्यांना लोकसभेत निवडून येण्यासाठी केरळ सारख्या मुस्लिम बहुसंख्य मतदारसंघाची गरज भासते, राहुल गांधी यांची छत्रपती शिवरायांशी तुला कधीच होणार नाही, सोशल मीडियावरील वादग्रस्त मजकूर तात्काळ हटवावा अन्यथा शिवप्रेमींच्या नाराजीला गांधी यांना सामोरे जावे लागेल असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.
राहुल गांधी यांची छत्रपती शिवरायांशी तुला कधीच होणार नाही, सोशल मीडियावरील वादग्रस्त मजकूर तात्काळ हटवावा अन्यथा शिवप्रेमींच्या नाराजीला गांधी यांना सामोरे जावे लागेल - विजयसिंह खाडे पाटील
हिंदू जनता आता जागृत: कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात काँग्रेसजन छत्रपती शिवरायांचे नाव घेत नाहीत. हिंदू मतांची विभागणी करून काँग्रेसचे नेते छत्रपती शिवरायांचा ट्रम्प कार्ड म्हणून वापर करत आहेत. मात्र हिंदू जनता आता जागृत झाली आहे, काँग्रेसच्या कट कारस्थानला हिंदू समाज कदापि बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया जनता युवा मोर्चाचे विजयसिंह खाडे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा -