ETV Bharat / state

खासगी क्लास चालकांकडून 12 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये आंदोलन

author img

By

Published : Nov 4, 2020, 6:13 PM IST

शाळा आणि कॉलेज बंद असले तरी शिक्षक आणि प्राध्यापकांचे वेतन सुरू आहे. मात्र खासगी क्लास चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. खासगी क्लास लवकर चालू करावेत या मागणीसाठी येत्या १२ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा क्लास चालकांकडून देण्यात आला आहे.

private class Teacher Agitations in Kolhapur
क्लास चालकांकडून 12 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये आंदोलन

कोल्हापूर- शाळा आणि कॉलेज बंद असले तरी शिक्षक आणि प्राध्यापकांचे वेतन सुरू आहे. मात्र खासगी क्लास चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. खासगी क्लास लवकर चालू करावेत या मागणीसाठी येत्या १२ नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर असोसिएशनने दिला आहे.

कोरोनामुळे राज्यासह देशातील सर्वच शाळा महाविद्यालय आणि खासगी क्लासेस पूर्णपणे बंद आहेत. राज्यातील शाळा महाविद्यालय अद्याप सुरू नाहीत. अशातच राज्य सरकारने दारू दुकाने हॉटेल्स यासह इतर व्यवसायाला परवानगी दिली आहे. मात्र खासगी क्लासेस घेण्यास पूर्णपणे बंदी आहे. शाळा महाविद्यालय बंद असली तरी प्राध्यापकांचे वेतन सुरू आहे. मात्र, खासगी क्लास बंद असल्यामुळे क्लास चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. नीट, सिईटी, स्पर्धा परीक्षा,बँकिंग परीक्षा, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा, सीए फाउंडेशन, आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रिया, इंग्लिश स्पिकिंग, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स असे सर्व क्लासेस बंद असल्यामुळे क्लासवर अवलंबून असणाऱ्यांवर उपासमारिची वेळ आली आहे.

हेही वाचा - कुस्तीचे फड बंद..! खुराकाचा खर्च काढणार कुठून? अनेक पैलवान कुस्तीला रामराम ठोकण्याच्या मनस्थितीत

क्लासवर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातील ५ हजारांपेक्षा अधिक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यातील खासगी क्लासेसला परवानगी द्यावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशनने केली आहे. खासगी क्लासेस सुरू करावेत अशी मागणी पालक वर्गातून होत आहे. मात्र राज्य शासनाने परवानगी दिली नसल्याने क्लासेस सुरू करता येत नाहीत. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे नूकसान होत आहे. त्यामुळे क्लासेस सुरू करण्यात यावेत अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्राद्वारे केली आहे. जर 10 नोव्हेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास 12 नोव्हेंबरला आंदोलन करण्यात येईल. असा इशारा जिल्हा प्रायव्हेट क्लास टीचर असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.अतुल निंगुरे यांनी दिला आहे.

काय आहेत खासगी क्लास चालकांच्या मागण्या

-इयत्ता नववी पासूनच्या पुढील वर्गाचे क्लासेस घेण्यास परवानगी द्यावी

- मार्चपासून क्लास संचालकांचे घरफळा, पाणी बिल, विज बिल पूर्णता माफ व्हावे

- मार्च महिन्यापासून प्रत्येक क्लास शिक्षकाला दरमहा वीस हजार रुपये नूकसान भरपाई द्यावी

हेही वाचा -'चंद्रकांत पाटलांनी 2019 सालीच कोल्हापूरातून निवडणूक लढायचा निर्णय घ्यायला हवा होता'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.