कोल्हापूर : कोल्हापूरातले दोन लाचखोर पोलीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ अडकले आहेत. मध्यरात्री 2 च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. कोल्हापूरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे. नागेश म्हात्रे असे चालखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक तर रुपेश कुंभार असे चालखोर पोलीस कॉन्स्टेबल चे नाव आहे. तब्बल 8 लाखांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहाथ पकडले आहे.
8 लाखांची लाच घेताना जाळ्यात : तक्रारदार यांच्याकडून आर्थिक फसवणुकीच्या गुन्हात आपल्याला सहकार्य करू असे सांगून लाचखोर सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश म्हात्रे आणि चालखोर पोलीस कॉन्स्टेबल रुपेश कुंभारने लाखोंची लाच मागितली होती. मात्र प्रत्यक्षात 8 लाखांमध्ये समजोता झाला. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास दोघांना जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरातच रंगेहाथ पकडले आहे. कोल्हापूर आणि सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळून ही संयुक्तपणे कारवाई केली. या घटनेनंतर संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ माजली. सर्वत्र याची चर्चा सुरू आहे.
सांगली येथे तक्रार दाखल : सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदारांनी आपल्याला आर्थिक फसवणुकीतील गुन्ह्यांमध्ये मदत करण्यासाठी कोल्हापुरातल्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि कॉन्स्टेबल या दोघांनी लाखोंची लाज मागितल्याची तक्रार दिली होती. याबाबत सांगली लाचलुचपत विभागाने कोल्हापूर लाचलुतपत विभागाला याबाबत माहिती देऊन या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करण्याबाबत कल्पना दिली. दोन्ही विभागाने संबंधित प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन आणि शहानिशा झाल्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये सापळा रचन्याचे ठरवले. त्यानुसार आज मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात सांगली आणि कोल्हापूर लाचलुतपत विभागाने संयुक्तपणे मिळून सापळा रचला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हात्रे आणि कॉन्स्टेबल कुंभार दोघेही आठ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा : Pune Crime : अवैधरित्या गावठी पिस्तूलची विक्री करणाऱ्या टोळीला अटक; 17 पिस्तूल, 13 जिवंत काडतुसे जप्त