कोल्हापूर : कोल्हापूरातील सिद्धीगिरी मठावर उभारण्यात येणाऱ्या 'कर्नाटक भवन'ला मोठा विरोध ( Opposition to Karnataka Bhawan ) होत आहे. याबाबत शिवसैनिकांनी आवाज उठवला असून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह काढसिद्धेश्वर महाराजांचाही निषेध ( Protest by Chief Minister of Karnataka ) शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वी केला ( Shiv Sainiks protest against Karnataka Bhavan ) आहे. एकीकडे अनेक वर्षांपासून सीमाभागासाठी लढा सुरू आहे. यामध्ये अनेकजण हुतात्मा झाले आहेत. असे असताना आमच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्रात येऊन जर कर्नाटक सरकार कर्नाटक भवन निर्माण करण्यासाठी निधी देत असेल आणि त्याला इथले काढसिद्धेश्वर महाराज जागा देत असतील तर हे लाजिरवाणे असल्याचेही शिवसैनिकांनी म्हंटले आहे. याबाबत शिवसैनिक कणेरी मठावर धडक देणार होते. मात्र काढसिद्धेश्वर महाराज मठावर नसल्याने हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. शिवाय लवकरच महाराज यांची भेट घेऊन याबाबत आमचे म्हणणे त्यांना सांगणार असून कर्नाटक भवन ला विरोध करणार असल्याचेही शिवसैनिकांनी म्हंटले आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ? मागील आठवड्यात कोल्हापूरातल्या कणेरी मठ येथे 'संत संमेलन' पार पडले. या कार्यक्रमासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह मंत्री व्ही. सोमन्ना, शशिकला जोल्ले, सी. सी. पाटील, मुरगेश निरानी, प्रल्हाद जोशी, केंद्रीय मंत्री, गोविंद कारजोळ, शंकर पाटील मुनीनकोप्पा आदी नेते मंडळींनी उपस्थिती लावली होती. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी अवघे कणेरी मठ 'कर्नाटकमय' झाले होते. या कार्यक्रमाचे अनेक ठिकाणी कन्नड भाषेत होर्डिंग लावण्यात आले होते. यावेळी आपल्या भाषणात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी कणेरी मठामध्ये कर्नाटक भवन साठी 5 कोटी देण्याबाबत घोषणा केली. शिवाय काहीही मदत लागल्यास आपले सहकार्य असल्याचेही त्यांनी म्हंटले. यालाच आता विरोध होत असून ज्या काढसिद्धेश्वर महाराजांचा हा कमेरी मठ आहे त्यांनी सुद्धा अशा गोष्टींना थारा देऊ नये असे शिवसैनिकांनी म्हंटले आहे. शिवाय एखाद्या विशिष्ट पक्षाचे काम करण्यासाठी ते प्रयत्न करत असतील तर आपला आक्षेप असल्याचेही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.
लवकरच काढसिद्धेश्वर महाराज यांच्याशी चर्चा मग पुढील दिशा : दरम्यान, वर्षांपासून सीमा लढा सुरू आहे. त्याच कर्नाटक साठी 'कर्नाटक भवन' बांधायला काढसिद्धेश्वर महाराज महाराष्ट्रात जागा देतात हे आमच्यासाठी लाजिरवाने आहे असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. त्यामुळे महाराजांना याबाबत आमची भूमिका स्पष्ट करणार असून या कर्नाटक भवन ला आमचा विरोध असणार असल्याचे शिवसैनिकांनी म्हंटले आहे. मठावरील आंदोलन तात्पुरते मागे घेतले असले तरी लवकरच ते जेंव्हा मठावर असणार आहेत तेंव्हा मठावर आंदोलन करणार असल्याचे शिवसैनिकांनी म्हंटले आहे.