ETV Bharat / state

कोल्हापुरात संततधार : पुणे-बंगळुरु महामार्गावर पंचगंगेचे पाणी, एकेरी वाहतूक सुरू

पंचगंगा नदीचे पाणी महामार्गावर आल्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूची लेन केली बंद करण्यात आली आहे.

कोल्हापुरात संततधार
author img

By

Published : Aug 5, 2019, 11:38 PM IST

Updated : Aug 5, 2019, 11:44 PM IST

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील 107 बंधारे गेले पाण्याखाली गेले असून पंचगंगा नदीचे पाणी महामार्गावर आल्यामुळे पुणे-बंगळुरु महामार्गाच्या पश्चिमेकडील बाजूची लेन केली बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे. रात्री पाण्याची पातळी वाढल्यास आणि आवश्यकता भासल्यास महामार्गाच्या दोन्ही लेन बंद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावर एकेरी वाहतूक

रात्री पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे, सातारा, बेळगाव, या ठिकाणीच अवजड वाहतूक थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महामार्गावरील वाहन चालकांना महामार्ग सोडून धाबे, हॉटेल आदी सुरक्षित ठिकाणी आपली वाहने पार्किंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच राष्ट्रीय महामार्ग 4 वरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी आज रात्री व उद्या दिवसा महामार्ग सुरू झाल्याची खात्री करूनच प्रवासाला सुरुवात करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी महामार्गाची पाहणी करून प्रशासनातर्फे प्रवाशांना सूचना दिल्या.

Intro:*कोल्हापूर ब्रेकिंग*

पुणे बेंगलोर हायवे (पश्चिमेकडील बाजू ) वरील सांगली फाट्याजवळ पंचगंगेचे पाणी आल्याने सदरची लेन केली बंद

एकेरी वाहतूक सुरू

आवश्यकता भासल्यास व पाण्याची पातळी वाढल्यास रात्री महामार्गाच्या दोन्ही लेन बंद करण्यात येतील..

रात्री पाणी वाढणेची शक्यता लक्षात घेऊन पुणे, सातारा, व बेळगाव, या ठिकाणीच अवजड वाहतूक थांबवणेच्या दिल्या सूचना

हायवेवरील वाहन चालकांना हायवे चा रस्ता सोडून धाबे , हॉटेल आदी सुरक्षित ठिकाणी पार्किंग करून थांबवीणेबाबत दिल्या सूचना

तसेच राष्ट्रीय महामार्ग 4 वरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांनी रात्री व उद्या दिवसा हायवे सुरू झाल्याची खात्री केल्या शिवाय प्रवासाची सुरवात करू नये अशा दिल्या सूचना

जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हायवेवर जाऊन पाहणी करून प्रशासनातर्फे दिल्या सूचना

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

जिल्ह्यातील 107 बंधारे गेले पाण्याखाली

पंचगंगा नदीची पाणीपातळी 49 फूट 6 इंच इतकी

आज रात्रीपासून राष्ट्रीय महामार्ग होणार बंद

कोल्हापूर शहराजवळ आले राष्ट्रीय महामार्गावर पाणी

रात्री 12 नंतर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद

पुण्याहून कोल्हापूर बेळगाव बेंगलोर कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीरBody:(अपडेटेड फ्लॅश with vis)Conclusion:.
Last Updated : Aug 5, 2019, 11:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.