ETV Bharat / state

बळीराजासोबत एक दिवस : बारमाही पाणी असलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याची अवस्था पाहा - कोल्हापूर

दुष्काळामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. कधीतरी शेतीला चांगले दिवस येतील, या आशेवर ते जीवन जगत असतात. दररोज अशा शेतकऱ्यांची करुण कहाणी आम्ही तुमच्यासाठी 'बळीराजासोबत एक दिवस' या सत्रातून घेऊन येत आहोत...या मालिकेतील आजची कोल्हापुरातील एका शेतकऱ्याची ही करुण कहाणी...

बळीराजासोबत एक दिवस
author img

By

Published : Jun 22, 2019, 10:48 AM IST

Updated : Jun 22, 2019, 12:16 PM IST

कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्याईमुळे जिल्ह्याला सदन जिल्हा म्हणून वेगळी ओळख प्राप्त झालेली आहे. मात्र, आजही या जिल्ह्यात शेतकरी अनेक समस्यांचा सामना करीत आहेत. त्यापैकीच एक असलेले कृष्णा आनंदा खोत या शेतकऱ्यासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला. ते कशाप्रकारे शेती करतात. शेतीतून मिळणाऱ्या उत्त्पन्नावरून कशाप्रकारे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात? हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यासंदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट...

कोल्हापुरावर निसर्गाची कृपादृष्टी; मात्र, अल्पभूधारक शेतकरी अजूनही कर्जाच्याच फेऱ्यात, बघा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट

संपूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी इथं क्लिक करा...

कोल्हापूर जिल्हा गंभीर दुष्काळाच्या कोसो दूर आहे. या जिल्ह्यावर वरूणराजाची नेहमीच कृपादृष्टी असते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीवर आपली प्रगती साधली आहे. काही शेतकरी आजही फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती करत आहेत. त्यापैकीच एक कृष्णात आनंदा खोत हे शेतकरी आहेत. खोत यांच्याकडे २ एकर शेती आहे. त्यांची पत्नी, एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे. मुलीने नुकतेच बी.एस.सी.चे शिक्षण पूर्ण केले आहे. एक मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत आहे, तर एक मलगा आता बारावीत शिक्षण घेत आहे. त्यांनी मुलांच्या शिक्षणाचा खर्च आजपर्यंत दुग्धव्यवसायवर केला. मात्र, आता त्यांच्यासमोर मुलीच्या लग्नाचा मोठा प्रश्न आहे.

खोत यांच्या सर्व भावांमध्ये मिळून एक विहीर आहे. या विहिरीच्या पाण्यावर बहुतांश शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, काही ठिकाणी त्यांनी १० हजार फूट पाईपलाईन टाकून नदीवरून शेतीसाठी पाणी आणले आहे. त्यासाठी सुद्धा त्यांचा लाखो रुपये खर्च झाला आहे. मात्र, त्याप्रमाणे पीक येईल याची शाश्वती नसते.

पावसाच्या अंदाजावरच शेती -
खोत हवामान खात्याच्या अंदाजावरच आपल्या शेतात कोणते पीक घ्यायचे? हे ठरवतात. शेतामध्ये प्रामुख्याने ते ऊसाची शेती करतात. पावसाच्या अंदाजावर ते भुईमूग, भात, सोयाबीन आदी पीके घेत असतात. हवामान खात्याने चांगला पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यामुळे त्यांनी उसाचे पीक घेतले आहे.

दुग्धव्यवसायवरच उदरनिर्वाह -
खोत यांच्याकडे एक गाय, एक म्हैस, दोन वासरे आणि एक बैल असे ५ जनावरे आहेत. त्यामध्ये गायी आणि म्हशीपासून सध्या त्यांना दिवसाला ५-६ लिटर दूध मिळते. दुध विकून मिळालेल्या पैशातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. जनावरांचे दूध बंद होते. तेव्हा मात्र त्यांच्यासमोर उदरनिर्वाह कसा चालवावा? हा प्रश्न निर्माण होतो.

सोसायटीच्या कर्जाच्या फेऱ्यात -
प्रत्येक वर्षी खोत आपल्या २ एकर जमिनीवर एकरी ४० हजार रुपयांप्रमाणे ८० हजार रुपयांचे कर्ज घेतात. प्रत्येक वर्षी शेतीसाठी बियाणे, औषध, खते आणि इतर खर्चासाठी कर्ज घ्यायचे अन् शेतीच्या उत्पन्नातून मिळालेल्या पैशाने कर्जाची परतफेड करायची, असे चक्र सुरूच असते. मात्र, कधी म्हणावे तसे पीक मिळत नाही. केलेल्या खर्चापेक्षा उत्पन्न कमी मिळते. अशावेळी कर्ज परतफेड करायचे कसे? असा प्रश्न त्यांना पडतो. पुन्हा कुणाकडून तरी कर्ज घेऊन सोसायटीचे कर्ज ते भरत असतात.

एक दिवस बळीराजासोबत : सदन जिल्हा ओळख असलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याची व्यथा 

अँकर : पन्हाळा तालुक्यातल्या माळवाडी गावातील हे कृष्णात आनंदा खोत. गेल्या अनेक वर्षांपासून ते आपल्या दोन एकर जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीने ऊस, भात आणि भुईमूगची शेती करतायेत. खरंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्याईमुळे कोल्हापूर जिल्ह्याला सदन जिल्हा अशी एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.  या सदन जिल्ह्यात अनेक असे शेतकरी आहेत, जे आजही शेकडो समस्यांचा सामना करत आपले आयुष्य जगत आहेत. त्यापैकीच एक हे कृष्णात आनंदा खोत. शेतीमध्ये त्यांना कोणकोणत्या समस्यांना समोरे जावे लागते, त्यांनी कशाप्रकारे आपली प्रगती साधलीये आणि कशाप्रकारे ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात यावर केलेला हा खास रिपोर्ट...

व्हीओ : कोल्हापूर जिल्हा खरतर गंभीर दुष्काळाच्या कोसो दूर आहे. वरूनराजाची नेहमीच कोल्हापूर जिल्ह्यावर कृपादृष्टी असते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतीवर आपली प्रगती साधलीये तर काही शेतकरी आजही फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती करत आहेत. त्यापैकीच एक कृष्णात आनंदा खोत हे शेतकरी आहेत. खोत यांच्या घरी त्यांची पत्नी एक मुलगी आणि दोन मुलं असा परिवार आहे. मुलगीने नुकतेच बीएससी चे शिक्षण पूर्ण केले आहे. एक मुलगा मेकॅनिकल इंजिनिअरिंग च्या पहिल्या वर्षात शिकत आहे तर एक मलगा आता बारावीत शिकत आहे. मुलांच्या शिक्षणाचा खर्च तर त्यांनी आजपर्यंत दुग्धव्यवसायवर केला पण आता त्यांच्यासमोर मुलीच्या लग्नाचा सुद्धा मोठा प्रश्न समोर आहे. 

सर्व भावांमध्ये मिळून विहीर आणि पाईपलाईन :
खोत यांच्या भावांमध्ये मिळून एक विहीर आहे. या विहिरीच्या पाण्यावर बहुतांश शेतीचे क्षेत्र ओलिताखाली येते पण काही ठिकाणी त्यांनी 10 हजार फूट पाईपलाईन टाकून नदीवरून शेतीसाठी पाणी आणलं आहे. त्यासाठी सुद्धा त्यांचा लाखो रुपये त्यांचा खर्च झाला आहे. 

पावसाच्या अंदाजावरच शेती : 
हवामान खात्याच्या अंदाजावरच खोत आपल्या शेतात कोणतं पीक घ्यायचं याचा निर्णय घेतात. शेतामध्ये प्रामुख्याने ते ऊसाची शेती करतात. पावसाच्या अंदाजावर ते भुईमूग, भात, सोयाबीन आदी शेती करत असतात. यंदा हवामान खात्याने चांगला पाऊस होईल अशी शक्यता वर्तवल्यानं त्यांनी उसाचे पीक घेतले आहे. 

दुग्धव्यवसायवरच उदरनिर्वाह : 
खोत यांच्याकडे पाच जनावरे आहेत. एक गाय, एक म्हैस, दोन वासर आणि एक बैल अशी पाच जनावरे. त्यातल्या गायी आणि म्हैशीपासून सध्या त्यांना दिवसाला 5-6 लिटर दूध मिळत आहे. दुधाच्या बिलातुन जेव्हढे पैसे भेटतात त्याच पैशातून खोत यांच्या घरचा खर्च ते बघतात. जेंव्हा जनावरांचे दूध बंद होते तेंव्हा मात्र त्यांच्यासमोर खर्चाच्या पैशासाठी मोठा प्रश्न समोर असतो.

सोसायटीच्या कर्जाच्या फेऱ्यात : 
प्रत्येक वर्षी खोत आपल्या दोन एकर जमिनीवर एकरी 40 हजार प्रमाणे 80 हजार रुपये एव्हडे कर्ज घेतात. प्रत्येक वर्षी शेतीच्या बियाणे, औषध, खते आणि इतर खर्चासाठी कर्ज घ्यायचं आणि शेतीच्या उत्पन्नातून जेव्हढे मिळतात त्यातून कर्जाची परतफेड करायची. कधी कधी म्हणावे तसे पीक मिळत नाही त्यामुळे केलेल्या खर्चापेक्षा उत्पन्न सुद्धा कमी मिळत. अशावेळी कर्ज परतफेडीसाठी पुन्हा कोणाकडून तरी हातउसने पैसे घ्यावे लागतात. 

ही कहाणी आहे महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमधील कृष्णात खोत या शेतकऱ्याची. अशीच काहीशी आणि त्याहूनही अधिक भयंकर अशी अवस्था आज महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची आहे. कधीतरी शेतीला चांगले दिवस येतील या एका आशेवर ते व त्यांचं कुटुंब आपला उदरनिर्वाह करत आहेत. 

(स्टोरी मोजोवरून पाठवली आहे त्यामध्ये ही स्क्रीप्ट update करा)
Last Updated : Jun 22, 2019, 12:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.