ETV Bharat / state

धक्कादायक : वृद्ध पतीला पेटवून महिलेची आत्महत्या, शुश्रूषेला कंटाळून उचललं पाऊल - कोल्हापूर गुन्हे

चंदगड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध पतीला जिवंत पेटवून महिलेने स्वतः आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कडलगे गावात संबंधित घटना असून पतीच्या आजारपणाला आणि शुश्रूषेला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे वृत्त आहे.

kolhapur crime
धक्कादायक : वृद्ध पतीला पेटवून पत्नीची आत्महत्या, पतीच्या शुश्रूषेला कंटाळून उचलले पाऊल
author img

By

Published : Jul 14, 2020, 12:46 PM IST

Updated : Jul 14, 2020, 2:13 PM IST

कोल्हापूर - चंदगड तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वृद्ध पतीला जिवंत पेटवून महिलेने स्वतः आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कडलगे गावात संबंधित घटना असून पतीच्या आजारपणाला आणि शुश्रूषेला कंटाळून तिने हे कृत्य केल्याचे वृत्त आहे. लक्ष्मण रवळू पाटील (वय 90 वर्षे) असे मृत पतीचे नाव असून पार्वती (वय 83 वर्ष) असे पत्नीचे नाव आहे.

धक्कादायक : वृद्ध पतीला पेटवून पत्नीची आत्महत्या, पतीच्या शुश्रूषेला कंटाळून उचलले पाऊल
धक्कादायक : वृद्ध पतीला पेटवून पत्नीची आत्महत्या, पतीच्या शुश्रूषेला कंटाळून उचलले पाऊल

लक्ष्मण पाटील यांनी पहिल्या पत्नीच्या निधनानंतर पार्वती हिच्याशी विवाह केला होता. त्यांना 2 मुले आणि 5 मुली आहेत. दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही मुले गावातच दुसऱ्या ठिकाणी बांधलेल्या घरात राहतात.

लक्ष्मण पाटील आणि पार्वती पाटील मात्र त्यांच्या जुन्याच घरात राहात होते. गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष्मण पाटील आजारपणामुळे अंथरुणाला खिळले होते. लहान मुलगा त्यांच्या औषधांचा खर्च करतो.

पाटील यांच्या आजारपणाला कंटाळलेल्या पत्नीने पती झोपेत असल्याचे पाहून अंगावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले. त्यानंतर स्वतःच्या देखील अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. दोघेही गंभीररीत्या भाजलेले होते. त्यामुळे रुग्णलायात त्यांचा मृत्यू झाला.

Last Updated : Jul 14, 2020, 2:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.