ETV Bharat / state

कोरोनाने नृसिंहवाडी दत्त जयंती यात्रा रद्द, परिसरात शुकशुकाट

नृसिंह मंदिरात दत्त जयंतीचे सर्व विधी परंपरेने करण्यात येत आहेत. मात्र, भाविकांना मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

नृसिंहवाडी दत्त मंदिर
नृसिंहवाडी दत्त मंदिर
author img

By

Published : Dec 29, 2020, 3:01 PM IST

Updated : Dec 29, 2020, 3:36 PM IST

कोल्हापूर - दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त लाखो भाविक नृसिंहवाडीला येत असतात. मात्र, नेहमी गजबजलेल्या कृष्णाकाठावर आज शुकशुकाट पाहायला मिळत आहे. गावकऱ्यांनाही कोरोनामुळे भाविकांना प्रवेश बंदी केली आहे.

कोरोनामुळे नृसिंहवाडी येथील दत्त जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. तर सर्व व्यवहारही आज बंद ठेवण्यात आले आहेत. नृसिंह मंदिरात दत्त जयंतीचे सर्व विधी मात्र परंपरेने करण्यात येत आहेत.

कोरोनाने नृसिंहवाडी दत्त जयंती यात्रा रद्द

हेही वाचा-सेनेचा काँग्रेसला सवाल -प्रादेशिक नेतृत्त्वाचे मन कोण वळवणार?

दरवर्षीप्रमाणे मंदिरात सजावट -
कोल्हापूरातील नृसिंहवाडीला दत्ताचे ठाणं (राजधानी) म्हणतात. याठिकाणी मनोहर पादुका आहेत. दत्त जयंतीला दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या असतात. भक्त जरी यंदा नृसिंहवाडीला येता येत नसले तरी दत्त जयंतीनिमित्त मंदिराची परंपरेने सजावट करण्यात आली आहे. मंदिरात विधिवत सर्वच पूजा पार पडल्या आहेत.

भाविकांसाठी लावलेला फलक
भाविकांसाठी लावलेला फलक

सर्व दुकानांचे व्यवहार बंद-

दरवर्षी दत्त महाराजांच्या नामस्मरणाने भक्तीचा पाट ओसंडून वाहत असतो. त्यामुळे येथील व्यावसायिक जयंतीपूर्वी मोठी तयारी करत असतात. नृसिंहवाडी हे पेढे आणि बासुंदीसाठीसुद्धा प्रसिध्द आहे. दत्त दर्शन घेतल्यानंतर भाविक पेढे आणि बासुंदी खरेदी करण्यासाठी दखील गर्दी करत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी संपूर्ण व्यवहार यावर्षी बंद ठेवले आहेत.

हेही वाचा-कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या

कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण देशभरात कमी होत असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या विषाणुची जनतेत भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी नियम लागू केले आहेत.

Last Updated : Dec 29, 2020, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.