ETV Bharat / state

Encroachment in Gayran : गायरानमधील अतिक्रमण काढण्याबाबत प्रशासनाकडून नोटीसा, आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज महामोर्चा - Notice regarding removal of encroachment in Gayran

गायरानमधील अतिक्रमण (Encroachment in Gayran) काढण्याच्या निर्णय विरोधात आता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. गायरानमधील अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात अतिक्रमणधारकांच्या घरांवर आजपासून नोटीस बजावण्यात सुरुवात केली (Notice regarding removal of encroachment in Gayran) आहे. या नोटीसद्वारे अतिक्रमण धारकांना पंधरा दिवसात आपले अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Encroachment in Gayran
गायरानमधील अतिक्रमण
author img

By

Published : Nov 15, 2022, 12:58 PM IST

कोल्हापूर : गायरानमधील अतिक्रमण (Encroachment in Gayran) काढण्याच्या निर्णय विरोधात आता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. गायरानमधील अतिक्रमण काढून घेण्यासंदर्भात अतिक्रमणधारकांच्या घरांवर आजपासून नोटीस बजावण्यात सुरुवात केली (Notice regarding removal of encroachment in Gayran) आहे. या नोटीसद्वारे अतिक्रमण धारकांना पंधरा दिवसात आपले अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यालाच विरोध करत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढण्यात येणार आहे.

कॅव्हेट दाखल करण्यात येणार : दरम्यान जिल्ह्यातील एकूण 1025 ग्रामपंचायत मधील अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज मंगळवारी कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती मिळते. याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीशांची अधिकाऱ्यांनी चर्चा केल्याचे सुद्धा माहिती आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले (grand march at collector office) आहे.

पहिला टप्पा : पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व गायरान मधील अतिक्रमणांचा सर्वे करण्यात आला आहे. आतापर्यंत १०२५ ग्रामपंचायतींपैकी केवळ 342 ग्रामपंचायतींनी आपल्या गावातील गायरानमधील अतिक्रमण धारकांची नोंद केली आहे. उरलेल्या ग्रामपंचायतींनी अध्याप आपल्या कार्यक्षेत्रातील अतिक्रमणांची माहिती दिलेली नाही. त्यामुळे राहिलेल्या ग्रामपंचायतींना देखील तातडीने माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या (administration regarding removal of encroachment) आहेत.

आजपासून दुसरा टप्पा : दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात अतिक्रमण धारकांना स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीस देण्यात येणार आहेत. त्याची सुरुवात आज मंगळवारपासून झाली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने या नोटीस मिळकत धारकांना लागू करण्यात येणार आहेत. स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे याच्याच विरोधात आज दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. आमदार सतेज पाटील हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.