कोल्हापूर - कोल्हापुरात आज पहाटेच पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत १० ते १५ मिनिटे पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
कोल्हापुरात वातावरणातील तापमानाचा पारा वाढल्याने अनेक दिवसांपासून नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. तर आज सकाळपासूनच ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील दोन दिवसांपासून कोल्हापुरात वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण झाल्याने शेतकरीसुद्धा पेरणीच्या कामात व्यस्त झाले आहेत. दरम्यान, आज अचानक मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे वातावरण मात्र आल्हाददायक बनले आहे.