ETV Bharat / state

अयोध्येतील राम मंदिरासाठी कोल्हापुरातील राम भक्ताचा 31 वर्ष अनवाणी प्रवास

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 18, 2024, 4:22 PM IST

Niwas Patil : अयोध्येत राम मंदिर उभं राहावं यासाठी अनेक कारसेवकांनी वेगवेगळे संकल्प केले होते. (Ayodhya Ram Temple) त्यापैकीच एक म्हणजे कोल्हापूरचे रामभक्त निवास पाटील हे होत. जोपर्यंत राम मंदिर होत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा निश्चय त्यांनी केला होता. गेली 31 वर्ष अनवाणी पायांनी त्यांनी प्रवास केला आहे. येत्या 22 जानेवारीला राम मंदिर लोकार्पणा दिवशी शिये गावकऱ्यांकडून पाटील यांचा सत्कार करून पादत्राणे प्रदान केली जाणार आहेत. (Karsevak)

Niwas Patil Ram devotee
निवास पाटील
राम मंदिर स्वप्नपूर्तीविषयी सांगताना निवास पाटील

कोल्हापूर Niwas Patil : अयोध्येत राम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम मंदिर निर्माण व्हावे यासाठी कोल्हापुरातील शिये गावच्या रामभक्ताने पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. 6 डिसेंबर 1992 रोजी प्रत्यक्ष कारसेवा करून बाबरीचा विवादित ढाचा पाडण्यात सहभाग असलेल्या या कारसेवकाने गेली 31 वर्ष अनवाणी पायानी प्रवास केला आहे. (Barefoot Travel) 22 जानेवारीला राम मंदिराची स्वप्नपूर्ती होणार आहे. या निमित्ताने या दिवशीच शिये ग्रामस्थांकडून नागरी सत्कार करुन पायात चप्पल घालण्यात येणार आहे. या स्वप्नपूर्तीमुळे आयुष्यातील अनमोल क्षण जगणार असल्याच्या भावना रामभक्त निवास पाटील यांनी व्यक्त केल्या. (Shiye Village)

'या' कारसेवकांनी दिलं होतं योगदान : अयोध्येतील बाबरी ढाचा पाडण्यासाठी कोल्हापुरातून त्याकाळी काही कारसेवक थेट अयोध्येत गेले होते. यामध्ये करवीर तालुक्यातील शिये गावच्या 35 जणांचा समावेश होता. यामध्ये पांडुरंग पाटील, विलास बुवा, सुनिता बुवा, बाबासो चौगुले, शिवाजी बुवा, सुवर्णा बुवा, बाबासो बुवा, उत्तम पाटील, शिवाजी काशीद, आनंदा पाटील, संभाजी पाटील, विजय चौगुले, नारायण जाधव, प्रकाश जाधव, अण्णासाो पाटील, तानाजी भोगले, निवास जाधव, बाबासाहेब चव्हाण, भैरवनाथ जाधव, तानाजी नलवडे, शंकर पाटील, निवृत्ती गिरी, मधुकर सुतार महाराज, हनुमंत शिंदे, निवास पाटील यांच्यासह दिवंगत आनंदा शिंदे, बळवंत चौगुले, शारदा चौगुले, तातोबा पाटील, बाबुराव शिंदे, रामचंद्र शिंदे, सुनील कांबळे, नारायण शिंदे, बाळासो चौगुले, बाबुराव पाटील, महादेव पाटील, या गावकऱ्यांचा समावेश होता.

शिये गावकऱ्यांकडून निवास पाटलांचा सत्कार: ऐन उमेदीच्या काळात राम मंदिरासाठी थेट आंदोलन करून परतत असताना निवास पाटील यांनी राम मंदिर पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. आता राम मंदिर पूर्णत्वास गेलं असून 22 जानेवारीला अभूतपूर्व मंदिराचं लोकार्पण होणार आहे. या निमित्तानं शिये ग्रामस्थांच्या वतीनं रिक्षा व्यावसायिक असलेल्या निवास पाटील यांचा संकल्प पूर्ण होत असल्यानं गावाच्या वतीनं 22 जानेवारीला निवास पाटील यांचा नागरी सत्कार आणि पादत्राणं प्रदान करण्यात येणार आहेत.

कोठारे बंधूंच्या बलिदानासमोर माझा त्याग काहीच नाही : बाबरीचा विवादित ढाचा पडताना कोठारी बंधूंनी प्राणाची आहुती दिली. त्यांचा त्याग अजूनही देश विसरला नाही. मी तर गेली 31 वर्ष पायात चप्पल घातलेली नाही. कोठारे बंधूंच्या बलिदानासमोर माझा त्याग काहीच नाही, अशा भावना निवास पाटील यांनी व्यक्त केल्या. 22 जानेवारीला गावात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमातच राम मंदिराची स्वप्नपूर्ती झाल्याबद्दल निवास पाटील यांना पादत्राणे प्रदान करण्यात येणार आहेत.

हेही वाचा:

  1. 4 शंकराचार्य जर प्राण प्रतिष्ठापनेला जाणारचं नसतील तर आम्हाला काय विचारता-रमेश चेन्निथला
  2. पुण्यात हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल; मिळाला 'एवढा' भाव
  3. बॉम्बच्या धमकीनंतर अभेद्य सुरक्षा व्यवस्था; अयोध्येचं अभेद्य 'किल्ल्यात' रुपांतर!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.