ETV Bharat / state

पानसरेंच्या हत्येला ४ वर्षे पूर्ण; कोल्हापुरात निघाला 'निर्भय मॉर्निंग वॉक' - Nirbhay morning walk

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्याने आज कोल्हापूरमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला.

कोल्हापूर
author img

By

Published : Feb 20, 2019, 10:55 AM IST

कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्याने आज कोल्हापूरमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला. यामध्ये प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह मेघा पानसरे, उमा पानसरे, मुक्ता दाभोळकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ विचारवंत सहभागी झाले.

निर्भय मॉर्निंग वॉक

कोल्हापूरमध्ये आज संध्याकाळी स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी जब्बार पटेल मार्गदर्शन करणार आहेत. चळवळीतील कार्यकर्ते आज बिंदू चौकात धरणे आंदोलनही करणार आहेत. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात येणार आहे. ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने तपास करून खरे मारेकरी समोर आणले. त्याचप्रकारे महाराष्ट्र एसआयटीनेही तपास करून दाभोळकर आणि पानसरे यांच्या मारेकऱ्यांना समोर आणण्याची गरज असल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी म्हटले आहे. तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. पण यामध्ये सुधारणा होण्याची गरज असून देशातील ४ विवेकवाद्यांची हत्या झाली आहे. त्यांना न्याय मिळावा, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीकडून ४ जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ८ आरोपींची एसआयटीकडून चौकशी झाली असून अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे या ४ जणांविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, खून करणे या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भक्कम पुराव्यांसह ८५ साक्षीदारांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला आहे.

undefined

Intro:कोल्हापूर- कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतरही तपासात गती नसल्याने आज कोल्हापूर मध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांनी निर्भय मॉर्निंग वॉक काढला. यामध्ये सामाजिक चळवळीतील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रा. एन. डी. पाटील यांच्यासह मेघा पानसरे, उमा पानसरे, मुक्ता दाभोळकर आणि ज्येष्ठ विचारवंत यामध्ये सहभागी झाले होते. दरम्यान कोल्हापूर मध्ये आज संध्याकाळी स्मृती जागर सभेचे आयोजन करण्यात आले असून जब्बार पटेल हे तिथे मार्गदर्शन करणार आहेत. तर आज चळवळीतील कार्यकर्ते बिंदू चौकात धरणे आंदोलनही करणार आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख यांनाही निवेदन देण्यात येणार आहेत. Body:ज्या प्रकारे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने तापस करून खरे मारेकरी समोर आणले त्याप्रकारेच महाराष्ट्र एसआयटीनेही तपास करून दाभोळकर आणि पानसरे यांच्या मारेकऱ्यांना समोर आणण्याची गरज असल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी म्हंटले आहे. तपास एका टप्प्यावर येऊन थांबला आहे. पण यामध्ये सुधारणा होण्याची गरज असून देशातील चार विवेकवाद्यांची हत्या झाली आहे त्यांना न्याय मिळावा असेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे. दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी एसआयटीकडून चार जणांवर पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ८ आरोपींकडे एसआयटी कडून चौकशी झाली असून अमित देगवेकर, अमोल काळे, वासुदेव सूर्यवंशी, भारत कुरणे या चार जणांच्याविरोधात ४०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कट रचणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त, खून करने या कलमाखाली हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भक्कम पुराव्यांसह ८५ साक्षीदारांचा अंतर्भाव यात करण्यात आला आहे. Conclusion:बाईट - प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ विचारवंत
बाईट - मुक्ता दाभोलकर, अंनिस कार्यकर्ती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.